Uddhav Thackeray : ठाकरेंचा जबरदस्त कॉन्फिडन्स; मोदींना दिलं आघाडीच्या पंतप्रधान शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण!

India Alliance News : अशातच आता निकालाआधीच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Mumbai Latest News : एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या चार टप्प्याचं मतदान झाले आहे. आता चार जूननंतर निवडणुकींचा निकाल कसा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाबबात वेगवेगळे कयास मांडले जात आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडी आपणच विजयी होणार असा दावा करत आहे. अशातच आता निकालाआधीच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिला आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील एका प्रचारसभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच निमंत्रण देतोय. आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपतविधीला तुम्ही या. मी आजच मोदींना (Narendra Modi) निमंत्रण देतोय. तुम्ही म्हणाल आजच का निमंत्रण देतोय? कारण खुर्चीवर माणूस बसलेला असतो तो पर्यंतच त्यांचं महत्त्व असतं. त्यानंतर त्यांना कुणी विचारत नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
BJP Vs Shivsena News: ठाकरेंची फडणवीसांवरील 'ती' टीका भाजपला चांगलीच झोंबली, आशिष शेलार म्हणाले...
Uddhav Thackeray
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

ठाकरे पुढे म्हणाले, "मला मुद्दामून मोदी आणि शाह यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला बोलावायचं आहे. त्यांना दाखवून दिलं पाहिजे की त्यांनी जे काही दहा वर्षे थापा मारल्या, आता खरं तर चार जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरु होत आहेत. मोदीजी आणि शाहजी तुम्ही आम्हाला लुटलंत, छळलत तेवढं खूप झालं. जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत, तसे तुम्ही तुमच्या गुजरातला जा आणि निवांत पडून राहा, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com