मुंबई : सहा जिल्ह्यामध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज झाली. त्यामध्ये भाजप (BJP) राज्यत क्रमांक १ चा पक्ष झाला, असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. त्याच बरोबर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले.
या निकालाच्या तपशीलात गेले तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून 25 टक्के जागा भाजपला मिळाल्या. तर 25 टक्के जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. उरलेल्या 50 टक्क्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सामावले आहेत. शिवसेनेच्या बळावर कोण मोठे होते आहे आणि शिवसेना कशी अधिकाधिक रसातळाला जात आहे, हेच या निवडणुकीतून दिसून येते आहे. भाजपचा जनाधार सातत्याने वाढतो आहे आणि इतरांचा जनाधार कमी होतो आहे. शिवसेना तर आणखी खाली जाते आहे. कोण रसातळाला जात आहे, हे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपवरच मतदारांनी विश्वास दाखविला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लखिमपूरप्रकरणी उत्तरप्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे राज्यातील आक्रोशित शेतकर्यांचा अधिक विचार राज्य सरकारने करण्याची गरज आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्दैवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्दैवी असते, असे फडणवीस म्हणाले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता. ते म्हणाले की, एनसीबीचे नाव काढले की नवाब मलिकांच्या पोटात का दुखते? त्यांचे दुखणे संपूर्ण राज्याला माहिती आहे, मला त्या जखमेवरील खपली काढायची नाही, असा टोला त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.