वंचित आणि महाविकास आघाडीत काॅंटे की टक्कर! : अकोल्यातील सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे

मतमोजणीनंतर जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे चित्र स्पष्ट झाले.
Akola Zilla Parishad
Akola Zilla Parishadsarkarnama
Published on
Updated on

अकोला : जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद (Zilla Parishad elections) आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 61.61% मतदान झाले. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया बुधवारी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पासून जिल्ह्यातील सात तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी पार पडली.

Akola Zilla Parishad
अमोल मिटकरींचा महाआघाडीला इशारा; भाजप विरोधात एकत्र या अन्यथा...

मतमोजणीनंतर जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे चित्र स्पष्ट झाले असून वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक सहा जागी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार विजयी झाले. दोन अपक्षांनी सुद्धा निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रत्येकी एक उमेदवार जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत विजयी झाले. सदर पोटनिवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 17 सदस्य होते.

पोटनिवडणुकीमध्ये वंचितचे सर्वाधिक सहा सदस्य निवडून आले असल्यामुळे त्यांचे एकूण 23 सदस्य झाले आहेत. पोटनिवडणुकीमध्ये विजय झालेल्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील अपक्ष प्रमोदिनी गोपाल कोल्हे या वंचित बहुजन आघाडीच्या बंडखोर सदस्या आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथून विजयी अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे हे भारिप बहुजन महासंघ अर्थात वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.

Akola Zilla Parishad
एनसीबीच्या पथकात भाजपचे पदाधिकारी; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

पोटनिवडणूकीनंतर जिल्हा परिषदेमध्ये वंचितचे 23, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 शिवसेनेचे 13, काँग्रेसचे४, भाजपचे 5, तर प्रहार जनशक्ती पक्षाचा एक आणि तीन अपक्ष सदस्य असे एकूण 53 जिल्हा परिषद सदस्य आहेत. महाविकास आघाडीचा विचार केला तर त्यांचे २२ आणि एक अपक्ष असे २३ सदस्य आहेत. तर वंचीतचेही २३ सदस्य आहेत. त्यामध्ये एका अपक्ष सदस्यांने त्यांना पाठिंबा जाहिर केला आहे. मात्र, तरीही येथील सत्तेच्या चाब्या अपक्ष आणि भाजपच्या हाती आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com