Devendra Fadnavis News : CM फडणवीसांनी स्वित्झर्लंडमधून मुंबईत परतण्याआधी केला लोढा डेव्हलपर्ससोबत करार; विरोधकांनी ठेवलं बोट...

CM Fadnavis Switzerland visit : दावोसमध्ये पहिल्या दिवशी तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे १९ सामंजस्य करार झाले आहेत.
CM Devendra Fadnavis in Davos
CM Devendra Fadnavis in DavosSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra CM news : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद सुरू असून पहिल्यात दिवशी महाराष्ट्राने १४ लाख ५० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. या माध्यमातून विविधी क्षेत्रांत १५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या करारांमधील एका करारावरून आता विरोधकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखविले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत हेही दावोसमध्ये आहेत. पहिल्या दिवशी राज्य सरकारने लोढा डेव्हलपर्ससोबतही सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत आयटी, डेटा सेंटर्ससाठी महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. काँग्रेसने याच करारावरून सोशल मीडियात सूचक पोस्ट केली आहे.

काँग्रेस केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘देवेंद्र फडणवीस मुंबईहून स्वित्झर्लंडला गेले. स्वित्झर्लंडचा पर्यटनाचा आनंद घेतला. भारतात परतण्याच्या फक्त एक दिवस आधी त्यांनी लोढा डेव्हलपर्ससोबत एक सामंजस्य करार केला. लोढा डेव्हलपर्सचे मुख्यालय मुंबईत आहे.’ काँग्रेसच्या या पोस्टमध्ये चर्चेला तोंड फुटले आहे.

CM Devendra Fadnavis in Davos
Pavitra Portal TET : शिक्षकांना नियुक्ती नाकारल्यास शिक्षण संस्थांना बसणार जोरदार दणका; सरकारने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, दावोसमध्ये पहिल्या दिवशी तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे १९ सामंजस्य करार झाले आहेत. या माध्यमातून आयटी, डेटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात १५ लाख रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे एमएमआरडीए आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले यांच्यात धोरणात्मक सामंजस्य करार झाला आहे. ही ५ वर्षांची भागीदारी मुंबई महानगर क्षेत्रात महानगर नियोजन आणि शहरी परिवर्तन मजबूत करण्यासाठी शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याला चालना देईल. शाश्वत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी डेटा अॅनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि पॉलिसी इनोव्हेशन हे प्रमुख क्षेत्र आहेत. हे सहकार्य संयुक्त संशोधन, हॅकेथॉन आणि अॅक्सिलरेटर प्रोग्रामद्वारे नवोपक्रमांना चालना देईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

CM Devendra Fadnavis in Davos
Teachers Recruitment : ... तर नव्याने TET द्यावी लागणार! शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी, वय, प्राधान्यक्रमांच्या तरतुदींमध्ये बदल

असे झाले सामंजस्य करार –

-    महाराष्ट्र शासन-लोढा डेव्हलपर्स

क्षेत्र : आयटी, डेटा सेंटर्स

गुंतवणूक : १ लाख कोटी

रोजगार : १ लाख ५० हजार.

-    महाराष्ट्र शासन - योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.

क्षेत्र : नविनिकरणीय ऊर्जा

गुंतवणूक : ४ हजार कोटी

रोजगार : ६ हजार

ठिकाण : पालघर/एमएमआर

-    महाराष्ट्र शासन-बीएफएन फॉर्जिंग्स

क्षेत्र : स्टील

गुंतवणूक : ५६५ कोटी

रोजगार : ८४७

ठिकाण : पालघर/एमएमआर

-    महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात

क्षेत्र : स्टील

गुंतवणूक : २० हजार कोटी

रोजगार : ८ हजार.

ठिकाण : गडचिरोली

-    एमएमआरडीए-एसबीजी समूह

क्षेत्र : लॉजिस्टिक्स

गुंतवणूक : सुमारे २० बिलियन डॉलर्स

रोजगार : ४ लाख ५० हजार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com