Raj Thackeray Meet Fadnavis: देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्थ'वर 'राज'कीय समीकरणं?

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता
Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Meets Raj Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २९) रात्री उशिरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यासाठी ते शिवतीर्थवर गेले होते. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकींची राजकीय समीकरणे शिवतीर्थवर दडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात सध्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी एकत्र महाविकास आघाडी (MVA) बनविली आहे. येत्या सर्व निवणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविणार असल्याचा दावा त्यांनी वारंवार केला आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेसमोरील आव्हान तगडे झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेचे नेते राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वारंवार संपर्कात असल्याचे दिसून येत आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
MPSC News : चार वर्षांनंतर नायब तहसीलदारांची निवड रद्द; 'एमपीएससी'ची कारवाई, काय आहे कारण?

यापूर्वी विविध ठिकणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर भाजपचे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींमुळे चर्चांना उधाण आले होते. त्यातच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या भेटींना महत्व प्राप्त होत आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis
Nana Patole News : विधानसभा, लोकसभा निवडणूक होईपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष; पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

यानंतर सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. या भेटीमागे आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे राजयकीय समीकरण दडल्याची चर्चा सुरू झाली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com