Nana Patole News : विधानसभा, लोकसभा निवडणूक होईपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष; पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

Congress State President : विधानपरिषद निवडणुकीपासून पटोले यांच्याविरोधात वातावरण
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole will be State President : काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत. काँग्रेसमधील बडे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे पटोले यांच्याविरोधात पक्षांतर्गत एक गट कार्यरत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत असल्याचे बोलले जात आहे. यावर पटोले यांनी एकाच वाक्यात विषय मिटवून टाकला आहे. पटोले 'सरकारनामा'शी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), शिवाजी मोघे आणि सुनील केदार यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. यावेळी त्यांनी पटोलेंविरोधात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यानंतर वडेट्टीवारांनी तशी काही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. विधानपरिषद निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रसमध्ये पटोले यांच्याविरोधात वातावरण झाले होते. दरम्यान, काँग्रेस नेते अशीष देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तत्पुर्वी चंद्रापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांवरही पटोले यांनी थेट कारवाई केली. त्यामुळे ही पक्षात पटोलेंविरोधात नाराजी वाढल्याचे सांगण्यात येते.

Nana Patole
Sanjay Shirsat On Loksabha : लोकसभा, विधानसभा एकत्र झाल्या, तर आम्ही तयार..

नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याबाबत काँग्रेसमध्ये हलचाली सुरू असल्याच्या चर्चा माध्यमांत झाडल्या. या पदावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतेज पाटील, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर या नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. यापैकी कुणाला तरी येत्या काही दिवसात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळणार, असे बोलले जात होते. या चर्चांना मात्र नाना पटोले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना एका वाक्यातच उत्तर देऊन पूर्णविराम दिला आहे.

Nana Patole
Sakal Saam Survey : भाजपला ३३ टक्के लोकांची पसंती; ठाकरे गटाला 12 टक्के तर शिंदे गटाबद्दल...; 'सकाळ'च्या महासर्वेक्षणामध्ये नागरिक म्हणतात...

आगामी काळात देशात लोकसभा (Loksabha) निवडणुका आहेत. तसेच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूकही होणार आहे. या निवडणुका होईपर्यंत मीच काँग्रेसचा (Congress) प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचे पटोले यांनी स्पष्टच सांगितले. नाना पटोले म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष पदावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही. त्यात काही तथ्य नाही. चर्चा काहीही होऊद्या, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष राहणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com