Devendra Fadnavis Meets Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- संजय राऊत यांची भेट, तब्बल 20 मिनिट चर्चा

Devendra Fadnavis Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीत मुख्यमंत्री आणि राऊत यांच्यात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis Meets Sanjay Raut
Devendra Fadnavis Meets Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे आजारामुळे काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांची तब्येतीत सुधारणार होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांची एका खासगी कार्यक्रमात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यावेळी मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. राजेश नार्वेकर यांच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नात ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे.

संजय राऊत यांना काही दिवस डाॅक्टरांनी आरामाचा सल्ला देत सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ल दिला होता. त्या सल्ल्यानंतर मागील काही दिवसांपासून राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली होती. आपल्या तब्येतीची अपडेट देताना आपण हळूहळू बरे होत आहोत असे देखील त्यांनी सांगितले होते.

राजेश नार्वेकर हे संजय राऊत यांचे व्याही आहेत. नार्वेकरांचा मुलगा मल्हार याच्यासोबत संजय राऊतांच्या मुलीचा विवाह झाला आहे. दरम्यान, नार्वेकर यांच्या घरात विवाह समारंभाला संजय राऊत उपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सभारंभासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राऊत यांची भेट घेतली. ही भेट काल (मंगळवार) झाल्याचे सांगितले जात आहे.

Devendra Fadnavis Meets Sanjay Raut
Supriya Sule: महाराष्ट्राच्या लौकिकास बट्टा, आयोगाची भूमिका बघ्याची; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नेमकी चर्चा काय?

संजय राऊत हे आजारी होते तेव्हा देखील ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली राजकीय मते व्यक्त करत होते. एकनाथ शिंदे आणि भाजपवर ते निवडणुकीच्या निमित्ताने टीका देखील करत होते. उद्धव ठाकरे यांनी देखील राऊत यांची भांडूप येथील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. दरम्यान, राऊत आणि फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

Devendra Fadnavis Meets Sanjay Raut
Municipal Election Result : 'गडबड-घोटाळे करण्यात भाजप 'मास्टर', EVM सुरक्षित राहतील याची खात्री काय? मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्याने रात्रच नव्हे; दिवसही वैऱ्याचा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com