Fadnavis On Sharad Pawar : 'हा तर राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट: कलाकारही ठरलेले, शेवट झाला की बोलू'; फडणवीसांचा टोमणा !

Devendra Fadnavis On Sharad Pawar : 'सगळं स्क्रिप्टेड वाटतंय..?"
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis On Sharad Pawar :Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Live Updats : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Ncp) आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा निर्णय नामंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णयाबाबत चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis On Sharad Pawar :
World Cartoonist Day: जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त, पाहा प्रसिद्ध 'चार' कलाकारांचे व्यंगचित्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यपूर्ण घडामेडींवर फडणवीस म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पक्षाअंतर्गत चित्रपट सुरू आहे. या चित्रपटाचे कलाकार देखील अंतर्गत आहे, याची पटकथा देखील अंतर्गतच आहे. त्यामुळे जोपर्यंत या सिनेमाचा शेवट होत नाही, तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे जेव्हा या पटकथेचा जेव्हा शेवट होईल, तेव्हाआम्ही यावर प्रतिक्रिया देऊ," असे फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चाललेल्या या घडामोडी स्क्रिप्टेड वाटत आहेत का? असा प्रश्न विचारला फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, "मी असं काहीही याक्षणी म्हणणार नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट घडून येईल, शेवटी काय होतंय, यावर प्रतिक्रिया देता येईल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Sharad Pawar Live: शरद पवारांचा राजीनामा अखेर मागे; कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून घेतला निर्णय

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार झाले होते. यानंतर निवडण्यात आलेल्या स्थापन केलेल्या समितीने शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची याचना केली. आजच्या बैठकीत अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव आज मांडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com