Devendra Fadnavis News: राहुल गांधींनंतर शरद पवारांचाही निवडणूक प्रक्रियेवर संशय; फडणवीसांचा 'पळपुटे' उल्लेख करत जोरदार पलटवार

Sharad Pawar Statement : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांनी शनिवारी विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटली, ती मला आम्ही तुमच्या 160 जागा निवडून आणून देऊ, अशी गॅरंटी देत होते, असा गौप्यस्फोट केला आहे.
rahul gandhi Devendra fadnavis sharad pawar (1).jpg
rahul gandhi Devendra fadnavis sharad pawar (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करुन मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप करत देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अशातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपुरातून खळबळजनक दावा केला. विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसांनी मला आम्ही तुमच्या 160 जागा निवडून आणून देऊ, अशी गॅरंटी दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.या दाव्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांनी शनिवारी (ता.9 ऑगस्ट) विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटली, ती मला आम्ही तुमच्या 160 जागा निवडून आणून देऊ, अशी गॅरंटी देत होते, असा गौप्यस्फोट केला आहे. या गौप्यस्फोटावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मीडियाशी संवाद साधताना शरद पवारांच्या (Sharad Pawar) आरोपांवरही भाष्य केलं. ते म्हणाले,राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करुन त्यांच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशाचप्रकारची अवस्था पवारसाहेबांची झाली नाही ना, असं खोचक पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तसेच आजपर्यंत राहुल गांधी यांनी अनेकदा ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली असली तरी शरद पवार तसं कधीच बोलले नव्हते. किंबहुना शरद पवारसाहेबांनी अनेकदा स्पष्ट भूमिका घेतली होती की, ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे. मात्र, आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार अचानक मतदानप्रक्रियेतील फेरफाराविषयी बोलू लागले आहेत. हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असा निशाणाही फडणवीसांनी पवारांवर साधला.

rahul gandhi Devendra fadnavis sharad pawar (1).jpg
Sharad Pawar News: राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का? शरद पवारांनी ठेवला सस्पेन्स कायम

फडणवीस म्हणाले,विरोधकांनी कितीही संभ्रम निर्माण केला तरी भारताइतक्या पारदर्शक आणि मुक्त पद्धतीने निवडणुका कुठेच होत नाहीत. ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्यावर आरोप करणारी मंडळी जनतेत बोलतात. पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर जात नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

तसेच निवडणूक आयोगाला शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. पण संसदेतील शपथ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात चालते का? असा सवालही उपस्थित केला. पण त्यांना माहिती आहे की, आपलं खोटं पकडलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, असे हे पळपुटे लोक आहेत, असा जिव्हारी लागणारा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

rahul gandhi Devendra fadnavis sharad pawar (1).jpg
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंनी दिल्लीत चावी फिरवली अन् 'इंडिया आघाडी'चा मोदी सरकारला धडकी भरवणारा 'हा' सर्वात मोठा निर्णय

मला एक गोष्ट लक्षात येत नाही, इतक्या दिवसांनी पवारसाहेबांनी राहुल गांधी यांना भेटल्यावरच या सगळ्याची आठवण का आली? इतके दिवस शरद पवार काहीही बोलले नाहीत, आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करुन त्यांच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशाचप्रकारची अवस्था पवार साहेबांची झाली नाही ना, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

शरद पवारांचा दावा काय..?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन जण आपल्याला भेटायला आले होते. या दोघांनी आपल्याला 160 मतदारसंघांमध्ये हमखास विजय मिळवून देतो, असे सांगितले होते. मात्र, आम्ही पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. हे सर्व आरोप देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढले् आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com