Maharashtra Politic's : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना त्याला शिंदे गटाकडून तीव्र हरकत घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी कौन्सिलच्या दिल्लीतील बैठकीला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविले आहे, त्यामुळे अर्थमंत्रीपदाबाबत राज्यात मात्र उत्सुकता वाढली आहे. (Devendra Fadnavis sent Sudhir Mungantiwar to the GST meeting)
अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिवसेना-भाजप युतीसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादीही राज्याच्या सत्तेत सहभागी झाली आहे. या मंत्र्यांनी गेल्या रविवारी (ता. २ जुलै) शपथ घेतली आहे. मात्र, मंत्रिपदाचा तिढा अजून काही सुटलेला दिसत नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा असताना शिंदे गटाने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. कारण शिवसेनेतून बाहेर पडताना शिवसेनेच्या या ४० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निधी देत नसल्याचा आरोप केला होता. त्याच अजित पवारांकडे पुन्हा अर्थखातं जाणार असेल तर पुन्हा आर्थिक कोंडी होण्याची शक्यता या आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यातून खातेवाटप लांबले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आज दिल्लीत जीएसटी कौन्सिलची ५० वी बैठक होत आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाणे अपेक्षित असते. मात्र, राज्यातील घडामोडीमुळे फडणवीस हे मुंबईतच असून त्यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना पाठविले आहे. सध्या ते बैठकीत सहभागी झाले आहेत. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आजच्या बैठकीला सुधीर मुनगंटीवार आल्याने अर्थमंत्रीपदाबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.