Bhujbal Question to Pawar : आम्हाला भाजपबरोबर लढायला सांगता अन्‌ हळूच जाऊन त्यांच्याशीच चर्चा करता?; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

लोकांना आश्चर्य वाटतंय, वळसे पाटलांनी शरद पवारांना का सोडलं? काहीतरी कारण असेलच ना.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Manchar News : राज्यात गेल्या पाच ते सात वर्षांत ज्या राजकीय घडामोडी पडद्याआड चालत होत्या. त्याचा उलगडा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे मलासुद्धा अनेक गोष्टी माहीत नव्हत्या, त्या आता माहिती होत आहेत. तळ्यात मळ्यात अशी भूमिका सतत होती. शेवटी अजितदादा म्हणाले तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहूया. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत विकास कामांचा वेग वाढण्यासाठी गेलो. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू, अशी ग्वाही छगन भुजबळ यांनी दिली. (Chhagan Bhujbal's question to Sharad Pawar)

राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात (मंचर ता. आंबेगाव) आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचे ढोल पथक व फटक्याच्या आतषबाजीत स्वागत केले. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकरचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.

Chhagan Bhujbal
Mohol NCP News : राजन पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची लवकरच सभा; बारसकरांकडून घेतली सोलापूरची खडान्‌खडा माहिती

भुजबळ म्हणाले की, लोकांना आश्चर्य वाटतं की दिलीप वळसे पाटील शरद पवार साहेबांना (Sharad Pawar) का सोडून गेले. काहीतरी कारण असेलच ना. आत्तापर्यंत पवारसाहेबांनी सांगितलं ‘बस की बस, उठ की उठ’ अशा रीतीने सगळ सुरु होतं. पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये आम्हीदेखील आहोत. अजित पवारांनी उलगडा केल्यानंतर समजले की, २०१४ मध्ये भाजपबरोबर आघाडी करायची असे ठरले. पण माघार घेतली. पुन्हा २०१७ मध्ये परत ठरलं, पण शिवसेना नको, परत मागे. भाजपबरोबर २०१९ ला जायचं ठरलं होतं. त्यासाठी अनेक वर्ष युती असलेल्या उद्धव ठाकरेंना सोडून द्या, असं भाजपला सांगितले.

Chhagan Bhujbal
Solapur Politic's : अजित पवारांना धक्का; शहराध्यक्ष अवघ्या आठ दिवसांत शरद पवार गटात सामील

अडीच अडीच वर्षे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री असे ठरले होते. पण, शेवटी आम्ही शिवसेनेबरोबर गेलो. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर गेली सात महिने सारख्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चेत मी नव्हतो. पवार साहेब, अजित पवार व जयंत पाटील हेच होते. मी तर पवारसाहेबांचं नाव घेऊन लढत होतो. आम्हाला तुम्ही लढायला सांगता आणि हळूच जाऊन चर्चा करता. या प्रकाराविषयी मला अतिशय दुःख झाले, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal
Baramati Loksabha : बारामती माझा आत्मा; तेथून लोकसभा लढण्याची अंतिम इच्छा; महादेव जानकरांनी दंड थोपटले

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे दिलीप वळसे पाटील हे आमच्याबरोबर आहेत. दिलीपराव हे अतिशय शांत, प्रभावी, अभ्यासू आणि जनतेसाठी काम करणारे नेतृत्व आहे. तुमच्या सगळ्यांचे त्यांच्यावर प्रेम आहे. पुढील काळात आम्ही सर्वजण मिळून कांद्याच्या प्रश्नासह जनतेचे प्रश्न मार्गी लावणार आहोत, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत नवी घडामोड; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर होणार फैसला

या वेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर, राजेंद्र भंडारी ,बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, सोपान नवले, नीलेश थोरात, संतोष भोर, अरविंद वळसे, दिलीप लोखंडे, रमेश खिलारी, महेश मोरे, गणेश थोरात, संतोष माशेरे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com