SSC HSC Exam : 10-12 वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर CM फडणवीसांचा मोठा निर्णय! 'त्या' शिक्षक आणि शाळांची धडधड वाढवली

Maharashtra Board Exams 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहावी-बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात मंगळवारपासून (ता.11 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या संदर्भात मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आला आहे.
Devendra Fadnavis On HSC Exam
SarkarnamaDevendra Fadnavis On HSC Exam
Published on
Updated on

Mumbai News, 11 Feb : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दहावी-बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात मंगळवारपासून (ता.11 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात दहावीची परीक्षा होणार आहे. याच परीक्षांच्या संदर्भात मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

त्यानुसार, दहावी-बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या परीक्षा केंद्रावर घडल्याचे उघडकीस येईल त्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द करावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांनाही बडतर्फ करावं असे, आदेश देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

Devendra Fadnavis On HSC Exam
TMC and Congress News : दिल्लीनंतर आता काँग्रेसला पश्चिम बंगालमध्येही झटका; ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय!

या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी संदर्भात संवाद साधला. यावेळी परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि कॉपीच्या घटनांना आळा घालण्यासाठी थेट ज्या परीक्षा केंद्रावर (Exam Center) कॉपीचे प्रकार उघडकीस येतील त्यांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांसह सरकारमधील मंत्री उपस्थित होते. तसंच परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करावे. हे पथक परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर जाईल आणि परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Devendra Fadnavis On HSC Exam
Somnath Suryawanshi Case : सरकारचा दूत अन् रॉकेल टाकण्याचा धंदा...; फडणवीस-शरद पवारांच्या शिलेदारांमध्ये जुंपली

तर संवेदनशील परीक्षा केद्रांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जावी. सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यासाठी एक विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तर परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची यांची संयुक्त जबाबदारी राहील, असंही फडणवीसांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com