Nagpur Police : CM फडणवीसांच्या 'गुडबुकमधील' आणखी एका अधिकाऱ्यांवर नागपूरची धुरा : चार महिन्यांत जिल्हाधिकारी अन् कमिश्नर बदलले

Nagpur law and order : मागील काही कालावधीपासून नागपूर शहरात गुन्हेगारी वाढली होती. मे महिन्यात तर १४ हत्यांनी नागपूर शरह हादरले होते. पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोहीम सुरू केली तरीही एमडी, गांजा यांची तस्करी सुरूच असल्याचे चित्र आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 24 Jun : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील चार महिन्यात गुडबुकमधील दुसऱ्या अधिकाऱ्याची नागपूरला बदली केली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सोलापूरचे जिल्हाधिकारीपदावरून कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदावर बदली केली होती. त्यानंतर चारच महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एका बड्या अधिकाऱ्याची नागपूरला बदली केली आहे.

राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या नवीन पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सध्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मागील काही कालावधीपासून नागपूर शहरात गुन्हेगारी वाढली होती. मे महिन्यात तर १४ हत्यांनी नागपूर शरह हादरले होते. पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोहीम सुरू केली तरीही एमडी, गांजा यांची तस्करी सुरूच असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे शहर व उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये नांगरे पाटील यांची नियुक्ती केल्याने त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.

Devendra Fadnavis
Sangram Thopte : अखेर थोपट्यांचं भाजपमध्ये जाणं सत्कारणी लागणार! ४४७ कोटींच्या कर्जमंजुरीचा मार्ग मोकळा

यापूर्वी बदली झालेले कुमार आशीर्वादही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके अधिकारी म्हणून ओळखले जातात. सोलापूरमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत कुमार आशीर्वाद यांनी अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलपणे विषय हाताळला होता. तसेच, सोलापूरची विमानसेवा मार्गी लागण्यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा सिंहाचा वाटा होता.

Devendra Fadnavis
Thane Politics : मसाल्यावरून शिवसेना-भाजपमध्ये 'भडका'; नगरसेवक आक्रमक; महापालिकेच्या कारवाईला विरोध

याशिवाय सोलापुरात आयटी पार्क उभारण्यातही आशीर्वाद महत्वाची भूमिका होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पाऊले उचलली होती. निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com