Ahmednagar News : नगर जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटेंना 'सीआयडी'कडून साडेसहा वर्षानंतर अटक, 'हे' आहे प्रकरण

CID Arrested Bhagyashree Mokate : नगरमधून फरार झाल्यानंतर भाग्यश्री मोकाटे ही पुणे शहरात आश्रयाला आल्या.
CID Arrested Bhagyashree Mokate
CID Arrested Bhagyashree Mokate Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवेळी नगर जिल्हयात पांगरमल येथे १२ फेब्रुवारी २०१७ ला दारुकांड झाले. त्यात नऊजणांचा बळी गेला,तर १३ गंभीर जखमी झाले होते. आपल्या निवडणूक प्रचारासाठी मतदारांना दारु पाजून हे दारुकांड घडविणाऱ्या आणि गेली साडेसहा वर्षे फरार असलेल्या शिवसेनेच्या नगर जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे (रा. इमामपूर, ता. जि. नगर) या मुख्य आरोपीला सीआय़डीने नुकतीच अटक केली.

पांगरमल येथील हे दारुकांड त्यावेळी नगरमध्येच नाही,तर राज्यातही गाजले होते. त्यात जखमी झालेल्यांपैकी एकाला अंधत्व आले,तर दोघांना अर्धांगवायू झाला होता. या गुन्ह्यांत भादवि कायद्याचे सदोष मनुष्यवधाचे कलम, दारुबंदी कायदा यासह मोक्का अशा तीन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.गुन्ह्याची व्याप्ती आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याचा तपास नंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआय़डी) सोपविण्यात आला होता.(Latest Marathi News )

CID Arrested Bhagyashree Mokate
प्राजक्त तनपुरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावले : भाग्यश्री मोकाटेंची करून दिली आठवण

2017 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता भाग्यश्री मोकाटे या जिल्हा परिषद,तर मंगल महादेव आव्हाड या पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या उमदेवार होत्या. 12 फेबु्वारी 2017 रोजी त्यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांना दारुसह जेवणाची पार्टी ठेवली होती. त्यात दारु पिल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला,तर 13 जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना अर्धांग वायू व एकास अंधत्व आले आहे. त्याबाबत वीस आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील 19 आरोपींवर 68 एवढे गंभीर गुन्हे दाखल असल्याने नंतर या प्रकरणाला मोक्काही लावण्यात आला होता.

या गुन्ह्यातील २० पैकी १७ आरोपींना पोलिसांनी अटक केली.तर दोघे मृत्यू पावले. मुख्य आरोपी भाग्यश्री मोकाटे(Bhagyashri Mokate) ही जिल्हा परिषद जेऊर गटातून 2017 मध्ये जि. प. सदस्य म्हणून निवडून आल्या. परंतू, हे दारुकांड होऊन त्यात आरोपी झाल्याने त्या गेल्या साडेसहा वर्षांपासून फरार होत्या. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पकड वॉरट काढण्यात आले होते.

CID Arrested Bhagyashree Mokate
Sharad Pawar News : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! ''..तर मला जालन्याला जावं लागेल!

दरम्यान,नगर(Ahmednagar)मधून फरार झाल्यानंतर भाग्यश्री मोकाटे ही पुणे शहरात आश्रयाला आल्या. पुणे जिल्ह्यातील म्हाळूंगे (ता.खेड) येथे एका नामांकित कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करीत होत्या.ही माहिती मिळताच सीआयडीने सापळा रचून त्यांना 27 ऑगस्ट रोजी पकडले.

सीआयडीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे,स्पेशल आय़जी संजय येनपूरे, पोलीस अधिक्षक पल्लवी बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास कोळी,सुनिल फकिरप्पा बनसोडे, उज्वला डिंबळे, पोलीस नाईक कदम यांनी ही कामगिरी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com