Anjali Damania: शासकीय बंगला न सोडल्यानं धनंजय मुंडेंना ४६ लाखांचा दंड! दमानियांं मुख्यमंत्र्यांना महत्वाचं आवाहन

Anjali Damania: या दंडाबाबत दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Anjali Damania against Dhananjay Munde : धनंजय मुंडे आता मंत्री नाहीत पण तरीही ते मुंबईतील मंत्र्यांसाठीच्या शासकीय बंगल्यात ठाण मांडून आहेत. यासाठी नियमानुसार त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यांचा हा दंड तब्बल ४६ लाख रुपये इतका होतो, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. तसंच या दंडाच्या वसुलीसाठी आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

Dhananjay Munde News
Bawankule on Raj Thackeray: शिवसेना-मनसे युतीबाबत राज ठाकरेंच्या संकेतांवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळे म्हणतात, आम्ही निवडणुका...

दमानिया यांचं म्हणणं काय?

अंजली दमानिया यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, "चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज ४ ऑगस्ट आहे. म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाही. यासाठी त्यांनी कारण देताना सांगितलं की, माझा आजारपणामुळं आणि मुलीच्या शाळेमुळं मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस असता तर त्यानं दोन बेडरुम आणि किचनचं घऱ विकत घेतलं असतं नाहीतर किमान भाड्यानं घेऊन राहिले असते.

पण शासकीय बंगला न सोडणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यावर आजतागायत ४२ नव्हे तर ४६ लाख रुपयांचा दंड बसतो. हा दंड माफ करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो, पण मुख्यमंत्र्यांनी हा दंड माफ करुन नये, अशी सक्त ताकीद किंवा विनंती मी मुख्यमंत्र्यांना करते. मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा एक रुपयाचाही दंड माफ करता कामा नये," असं दमानिया यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडेंकडून संपूर्ण दंड वसुली करुन चार दिवसांत त्यांनी ही जागा खाली करुन त्यांचं निवासस्थान इथून हालवलं पाहिजे, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.

Dhananjay Munde News
Satej Patil on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस नेमकं कुठं चुकतात? सतेज पाटलांचे निरीक्षण अन् सल्लाही...

दंडाची अंमलबजावणी कशी होते?

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या वाल्मिक कराडचा संबंध असल्याचं समोर आल्यानं नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांना आपलं अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं आणि मंत्रीपदाचा राजीनामा देणं भाग पडलं होतं. ४ मार्च २०२५ रोजी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सोपवला. या मंत्रीपदाच्या काळात त्यांना सातपुडा हा शासकीय बंगला राहण्यासाठी देण्यात आला होता.

मुंडे राहत असलेल्या सातपुडा बंगल्याचं एकूण क्षेत्रफळ हे ४ हजार ६६७ चौरसफूट इतकं आहे. मंत्रीपद केल्यानंतर पंधरा दिवसांत बंगला खाली करावा लागतो. जर नाही केला तर प्रतिचौरस फूट २०० रुपये दंड आकारला जातो. या दंडाच्या नियमानुसार, मुंडे यांच्या वाट्याला महिन्याला ९ लाख ३३ हजार रुपये इतका दंड येतो. तसंच त्यांनी गेली पाच महिने बंगला सोडलेला नाही त्यामुळं हा दंड ४६ लाख रुपयांच्या घरात गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com