
Mumbai News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे.त्यांच्या राजीनाम्यावरुन सरकारवरचा दबाव वाढत असतानाच दुसरीकडे वाल्मिक कराडवर आता 'मोक्का'कारवाई कारवाई करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तातडीनंं परळीकडं रवाना झाले आहेत.
मकोका कारवाईनंतर आता देशमुख हत्याप्रकरणी कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. याचदरम्यान,राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतल्यानंतर ते तातडीने परळीकडे रवाना झाले आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी(ता.14) उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईतील त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजितदादांशी जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा केली. यात वाल्मिक कराड मोक्का कारवाई,कराड समर्थकांचं परळीतलं आंदोलन यांविषयावर सविस्तर चर्चा केली.
या भेटीनंतर धनंजय मुंडे हे तातडीने परळीकडे रवाना झाले आहेत.संतोष देशमुख हत्येचा कट रचल्याचा आरोप करत वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आवळला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सुरुवातीपासूनच ज्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे,अशा धनंजय मुंडेंवरच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून उचलून धरली जात आहे.
वाल्मिक कराडवरील मकोका कारवाईनंतर आता परळीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.कराडची पत्नी, आई यांनी गेल्या 12 तासांपासून रात्री उशिरापर्यंत परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.तर त्यांच्याबरोबर समर्थकही तेथून हटलेले नाही.याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी वाल्मिक कराड याच्या चार समर्थकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड हत्याप्रकरणात मकोका दाखल झालेल्या वाल्मिक कराडवर मोठं भाष्य केलं.ते म्हणाले, दिवंगत संतोष देशमुख यांचं कुटुंब मग त्यात त्यांची मुलगी ,पत्नी किंवा मग भाऊ असेल हे तपास अधिकाऱ्यांना भेटत आहे.
या तपासात पुढे काय होतंय की नाही,याबाबत त्यांचं कुटुंब चिंतेत आहे. वास्तविक पोलिस यंत्रणा त्यांचं काम करत आहे,सीआयडी,एसआयटीमार्फत अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहे.न्यायाधीशांच्या मार्फतही या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.