Walmik Karad : परळी 'हायअलर्ट'वर; कराडवरील मोक्का कारवाईनंतर समर्थकानं स्वत:ला पेटवून घेतलं

Protest For Walmik Karad In Parli : आता कराडवर 'मकोका' कायद्यांतंर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे.यानंतर परळीतलं राजकारण तापलं असून त्यांच्या समर्थकानं स्वत:ला पेटवून घेतलं आहे.
walmik karad
walmik karadsarkarnama
Published on
Updated on

Parli News : मस्साजोगचे दिवगंत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. 2 कोटींच्या खंडणीप्रकरणात अटक केलेल्या आणि देशमुख हत्येप्रकरणातला आता वाल्मिक कराडचा (Walmik Karad) पाय आणखी खोलात गेला आहे. आता कराडवर 'मकोका' कायद्यांतंर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे.यानंतर परळीतलं राजकारण तापलं असून त्यांच्या समर्थकानं स्वत:ला पेटवून घेतलं आहे.

वाल्मिक कराड याचे समर्थक परळीत (Parli) भलतेच आक्रमक झाले आहेत. कराड याची आई गेल्या 12 तासांपासून रात्री उशिरापर्यंत परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिलेला आहे. तर त्यांच्याबरोबर समर्थक देखील हटलेले नाही. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी वाल्मिक कराड याच्या चार समर्थकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला

एका महिलेनं स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घ्यायचा प्रयत्न केला.तिथं उपस्थित महिलांनी वेळीच प्रसंगावधानता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आता सायंकाळी पुन्हा एका समर्थकांनं परळीत आंदोलनस्थळी स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती समोर येत आहे.

walmik karad
Walmik Karad : वाल्मिक कराडला मकोका लागताच अंजली दमानिया यांनी केली ही मागणी

तीन पुरुष आणि एका महिलेनं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले. समर्थकांच्या या आक्रमकपणामुळे पोलिस प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी काही क्षणात संक्रांत सणानिमित्ताने गजबजलेली परळीची बाजारपेठ बंद केली.

याशिवाय वाल्मिक कराड याची आई गेल्या 12 तासांपासून परळी पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून आहेत. माझ्या पोरावर चुकीची कारवाई करण्यात आल्याची भूमिका घेत, कराड कुटुंब पोलिस ठाण्यासमोर हटायला तयार नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण आला आहे.

walmik karad
Sharad Pawar News : शरद पवारांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; केजरीवाल म्हणाले, थँक्यू सर..! काय घडलं?

तसेच समर्थकांनी परळीत एवढा राडा घातला की, टाॅवरवर, कमानींवर चढून आंदोलन केले. तसेच रस्त्यावर टायर जाळून फेकले. वाल्मिक कराड याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी परळीमध्ये बंदोबस्त वाढवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com