Dharmaveer 2 : "भाजपच्या मदतीने आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा..." राऊतांचा CM शिंदेंवर गंभीर आरोप

Sanjay Raut On Dharmaveer 2 : "एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारे आणि अनेक लोक दिघे साहेबांच्या अत्यंत जवळ होते. त्यामुळे धर्मवीरांवर काल्पनिक कथेद्वारे पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा तुम्ही शिवसेनेची प्रतिष्ठा जपली असती तर तुमच्यावर असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती."
Ekanth Shinde, Devendra Fadnavsi Sanjay Raut
Ekanth Shinde, Devendra Fadnavsi Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 27 Sep : शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात वाद सुरु झाला आहे.

अशातच आता शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या मदतीने आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.

'धर्मवीर 2' चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, या चित्रपटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लोकांना फारसं माहिती नसलेलं आयुष्यही समोर आलं आहे. 'धर्मवीर 2' चं स्क्रीनिंग सुरू झालं आहे. स्वर्गीय आनंद दिघेंच्या प्रेरक जीवनावर आधारित 'धर्मवीर' हा चित्रपट पाहिला.

त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्याचं ते म्हणाले. शिवाय जेव्हा धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन, असं वक्तव्य फडणवीस यांनी यावेळी केलं. फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप करत फडणवीसांचाही समाचार घेतला आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavsi Sanjay Raut
Shivsena Vs BJP : भाजपच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे उपोषण, काय आहे प्रकरण?

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, धर्मवीरांची व्याप्ती काय होती हे आम्हाला माहिती आहे. ते फडणवीसांना माहीत आणि एकनाथ शिंदेंना माहिती नाही. आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यांना आता भाजपच्या मदतीने बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत ते एकनाथ शिंदे यांना मानत नाहीत. त्यामुळे अशा सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन प्रतिक निर्माण करायचं काम सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.

...तर तुमच्यावर असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती

आनंद दिघे हे निष्ठावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीला ते सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारे आणि अनेक लोक दिघे साहेबांच्या अत्यंत जवळ होते. त्यामुळे धर्मवीरांवर काल्पनिक कथेद्वारे पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा तुम्ही शिवसेनेची प्रतिष्ठा जपली असती तर तुमच्यावर असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती.

Ekanth Shinde, Devendra Fadnavsi Sanjay Raut
Dharmaveer 2 : 'धर्मवीर 3'ची स्क्रिप्ट फडणवीस लिहिणार? शिवसेना 'UBT'चे खासदार देसाईंचा खोचक टोला...

दिघेंना आम्ही जास्त ओळखायचो. धर्मवीर यांचा एका सिनेमात मृत्यू दाखवलेला आहे. आता धर्मवीर दोन काढत आहेत, धर्मवीर तीन काढतायत, धर्मवीर विचार काढताय. हे काय अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का? खरं म्हणजे गोलमाल वन, टू, थ्री असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी शिंदेवर हल्लाबोल केला.

फडणवीसांना धर्मवीर काय माहिती आहेत?

तर धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, "फडणवीसांना काय धर्मवीर माहिती आहेत? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटायला दिल्ली आणि गुजरातमधून जे नवीन अफजलखान आणि औरंगजेब येत आहे त्यांच्यावर त्यांनी सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com