Bihar Election: बिहारमधील दारुण पराभव जिव्हारी; काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, एकाचवेळी 7 जणांची हकालपट्टी

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू प्रणित एनडीएनं काँग्रेस अन् राजदचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली.या विजयात विरोधकांना मोठा झटका बसला. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलेल्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत राजकीय वारं फिरलं. एनडीएनं तब्बल 202 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली.
Rahul Gandhi congress
Rahul Gandhi congresssarkarnama
Published on
Updated on

Bihar News: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत 'एनडीए'ची त्सुनामी आली. या त्सुनामीत काँग्रेस आणि आरजेडी यांच्या महाआघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला. बिहारमध्ये 243 जागा असलेल्या तब्बल 202 जागांवर एनडीएनं बाजी मारली.यात विशेष म्हणजे 101 जागा लढणार्या भाजपने 89 तर नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षानं 101 जागा लढवताना 85 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे बिहारमधील दारुण पराभव जिव्हारी लागलेल्या काँग्रेसनं निवडणुकीनंतर सर्वात मोठी कारवाई केली आहे.

काँग्रेस आणि आरजेडी पक्षांसह महाआघाडीत बिहार(Bihar) विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, काँग्रेसकडून बिहारमध्ये निवडणुकीनंतर सर्वात मोठी कारवाई करताना सात नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी निवेदनाद्वारे या नेत्यांवरील निलंबनाच्या कारवाईबाबत माहिती दिली आहे.

बिहार प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीनं सात बड्या नेत्यांना कारवाईचा मोठा दणका दिला आहे. या नेत्यांवर काँग्रेसच्या मुख्य तत्त्वं, शिस्त अन् संघटनात्मक शिष्टाचाराविषयी हलगर्जीपणा आणि सातत्यानं दिशाभूल करणारी वक्तव्य करण्यात आल्याचा ठपका काँग्रेस शिस्तपालन समितीनं ठेवला आहे. या सातही काँग्रेसच्या नेत्यांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

काँग्रेस सेवा दलाचे माजी उपाध्यक्ष आदित्य पासवान, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष शकीलुर रहमान, किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकुमार शर्मा, युवा काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष राजकुमार राजन, मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष कुंदन गुप्ता, बांका जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षा कांचना कुमारी आणि नालंदा जिल्हा नेते रवी गोल्डन यांना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं निलंबित केलं आहे.

Rahul Gandhi congress
Ashish Deshmukh News : आमदार आशिष देशमुखांचा थेट पक्षश्रेष्ठींनाच इशारा, भाजपनं तडकाफडकी 'तो' पक्षप्रवेशच गुंडाळला

याबाबत शिस्तपालन समितीचे अध्यक्ष कपिल देव प्रसाद यादव म्हणाले, निलंबित करण्यात आलेल्या यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, त्यांच्याकडून खुलासा न आल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व नेत्यांनी सातत्याने पक्ष व्यासपीठाबाहेर काँग्रेसच्या निर्णयांविरुद्ध भाष्य केले होते.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू प्रणित एनडीएनं काँग्रेस अन् राजदचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली.या विजयात विरोधकांना मोठा झटका बसला. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलेल्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत राजकीय वारं फिरलं. एनडीएनं (NDA) तब्बल 202 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली.

Rahul Gandhi congress
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट; काँग्रेस नेते नाना पटोलेंनी घेतली भाजपच्या 'या' नेत्याची भेट

एनडीएनं तब्बल 202 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. तर विरोधकांच्या महाआघाडीला अवघ्या 35 जागांवरच विजय मिळवता आला. विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळाचा आकडा गाठण्यातही आघाडीला यश आलं नाही. या दारुण पराभवानंतर बिहारमधून एक सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com