Thackeray-Shinde Politics: मुख्यमंत्री अयोध्येला नेलेल्या गुंडांना शरयु तिरावर शुद्ध करायला घेऊन गेले होते का? राऊतांनी डिवचलं

एकनाथ शिंदे यांनी नुकताच अयोध्या दौरा केला.या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्यातील बरेच मंत्री गेले होते.
Thackeray-Shinde Politics:
Thackeray-Shinde Politics:Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Criticized CM Eknath Shinde| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानाने जे गुंड नेले होते त्यांना शरयू तीरावर पवित्र करण्यासाठी घेऊन गेले होते का?,असा प्रश्न विचारत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटाला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकताच अयोध्या दौरा केला.या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्यातील बरेच मंत्री गेले होते.या दौऱ्यात त्यांच्यासोबत जाणाऱ्या मंत्र्यांवरही संजय राऊतांनी टिकास्त्र डागलं आहे.

अयोध्येत बोलताना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांवर टीका करताना कुख्यात गुंड दाउदचा उल्लेख केला होता.आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत म्हणून आम्ही वेगळं सरकार स्थापन केलं, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर, एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या वडिलांबद्दल बोलावं, शिवसेनेच्या वडिलांबद्दल बोलणाच्या शिंदेना कोणताही अधिकार नाही, असा टोला राऊतांनी लगावला. याचवेळी बाळासाहेब ठाकरे हे गद्दारांच्या आणि बेईमानांच्या विरोधात लढले. बेईमान्यांना रस्त्यावर उतरवून त्यांचे कपडे काढून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. आता आम्हीही त्यांच्या विचारांचं पालन करावं का?, असा पलटवार राऊत यांनी केला.

Thackeray-Shinde Politics:
NCP Corporator's son Arrested: दापोली नगरपंचायतीत कोट्यावधींची भ्रष्टाचार; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलाला अटक

याच वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्येतील शक्ती प्रदर्शनावरही निशाणा साधला आहे. "दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनचं जास्त होतं.आम्ही सुद्धा याआधी दर्शन घेतलेलं आहे. दर्शन आणि शक्तिप्रदर्शनात खुप फरक आहे. ज्या पुरुषोत्त्म रामाची आपण पूजा केली त्या रामाने वनवासात जाताना आपला भाऊ भरत याला राज्य दिलं आणि राज्य चालवताना भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपला संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे विचार अंमलात आणले हा विचार किती लोकांना पटतो आणि पटलाय मला माहित नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

शक्तीप्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे. ठाण्याचा नाकाही आहे ना, तिथे करा शक्तीप्रदर्शन. तुमच्या विमान जे गुंड, मवाली, खंडणीखोर बसले होते. विमानात तुमच्या शेजारी जे बसले होते. शरयु नदीत त्यांना शुद्ध करायला घेऊन गेले होता का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com