NCP Political Crisis : शरद पवारांना मोठा धक्का ! वायबी सेंटरच्या बैठकीला उपस्थिती लावलेल्या आमदाराचं २४ तासांतच अजितदादांना समर्थन

Maharashtra Political Crisis : '' शरद पवार गटातील आणखी काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे..''
Devendra Bhuyar and Ajit Pawar
Devendra Bhuyar and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उभ्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा करतानाच बहुतांश आमदार आपल्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. याचवेळी पवार गटाकडून देखील अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांपैकी काहीजण आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी(दि.५) मुंबईत झालेल्या दोन्ही गटाच्या बैठकीत कुणाकडे किती आमदार आहेत हे स्पष्ट झालं आहे. याचदरम्यान, शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदाराने आता अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.

शरद पवारां(Sharad Pawar)नी आयोजित बुधवारी आयोजित केलेल्या वायबी सेंटर येथील बैठकीला मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार उपस्थित होते. तसे ते नेहमीच अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांनी पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या बैठकीनंतर २४ तासांतच भुयार यांनी आपल्या भूमिकेपासून यू टर्न घेत अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.

Devendra Bhuyar and Ajit Pawar
NCP Crisis News : "ठाण्याच्या पठ्ठ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं पार वाटोळं झालं"; अजित पवारांनी आव्हाडांवर हल्लाबोल

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत गेल्यानं त्यांच्याकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या अधिक आहे. पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुण्यातील १० पैकी बहुतांश आमदार अजित पवारांकडे गेले आहेत. तर काही वेट अँड वॉचच्या स्थितीत आहेत. त्यातच आता शरद पवारांचा मेळाव्याला उपस्थिती लावलेले आमदार देवेंद्र भुयार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांना समर्थन दिलं आहे.

Devendra Bhuyar and Ajit Pawar
Maharashtra Political Crisis : शिंदे - फडणवीस - पवार सरकारमध्ये खातेवाटपाचा तिढा कायम; आता बंगल्यांवरुन राजकारण तापणार..?

पवार गटाच्या वायबी सेंटर येथील मेळाव्याला काही तास उलटत नाही तोच देवेंद्र भुयार यांनी अजित पवार गटाला सामील झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, शरद पवार गटातील आणखी काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे असा दावा पवार गटाकडून केला जात आहे. त्यामुळे शरद पवार गटातील आणखी काही आमदार अजित पवार (Ajit Pawar)गटात सामील होणार का? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com