Sharad Pawar Speech : राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष तर आमचे नेते सत्तेत कसे घेतले...; शरद पवारांचा थेट पंतप्रधानानां सवाल

Sharad Pawar : कारण त्यांना माहिती होतं आपलं नाणं चालणार नाही.
Sharad Pawar Speech :
Sharad Pawar Speech :Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Speech : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये एका सभेत बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. जर आमचा पक्ष हा भ्रष्टाचारी असेल तर तुम्ही आमचे नेते तुमच्या सरकारमध्ये कसे घेतले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज अजित पवार गट आणि राष्ट्रवादीची सभा पार पडली. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित सभेत शरद पवार यांनी अजित पवार आणि थेट नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे." पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी वक्तव्ये करण चूकीचं आहे. त्यानंतर निवडणुकीदरम्यान आले आणि प्रचंड शिवीगाळ केली, नुसते आरोप केले. पण त्यातलं सत्य सांगितलं पाहिजे. पण तेवढी धमक दाखवली नाही. आपण देशाचे नेते आहोत. पंतप्रधान पदालाही मर्यादा आहे, . राष्ट्रवादी पक्ष इतका भ्रष्ट होता तर राष्ट्रवादीच्या लोकांना शपथ का दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Sharad Pawar Speech :
Chitra Wagh On Sanjay Raut: वाह रे नौटंकीबाज ! चित्रा वाघ संजय राऊतांना असं का म्हणाल्या ?

मी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळ पाहिला आहे. केंद्रात मी अनेकदा काम केलं आहे. पण पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहे. आमदारांंना ईडी,सीबीआयची भिती दाखवून पक्षात सामील करुन घेतले जात आहेत.

राष्ट्रवादीतील काही जणांनी वेगळ होण्याची भूमिका घेतली पण त्यांना ज्या कार्यकर्त्यांनी इथपर्यंत आणलं त्यांचा विचार का केला नाही. आपण पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेतली. पण माझी तक्रार नाही. पण आज त्यांच्या बॅनरवर माझा सर्वात मोठा फोटो आहे. कारण त्यांना माहिती होतं आपलं नाण चालणार नाही. असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. नाशिकला जबरदस्तीने राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा मिळवला. पण मी जेव्हा वेगळा निर्णय घेतला होता तेव्हा काँग्रेसची प्रॉपर्टी सोडून दिली होती. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Sharad Pawar Speech :
Sharad Pawar Live Speech : चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांनी थोपटले दंड

मी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली. आम्ही अनेक चिन्हांवर लढलो. कुणी चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, अस म्हणत असेल तर तसं होणार नाही. सामान्य माणसाच्या अंतकरणात जो विचार आहे, तोपर्यंत काळजी करण्याचं कारणं नाही. घड्याळ, पक्ष आमचा असल्याचा दावा केला. पण चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. फुटीर गटाने पक्ष ताब्यात घेणं योग्य नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com