Dilip Walse Patil : मंत्रिपदाला नकार दिल्यानंतर वळसे पाटलांसाठी अजितदादांची दिल्लीत 'फिल्डिंग'; मोठी जबाबदारी दिली जाणार?

Mahayuti Government : एकीकडे रुसव्या फुगव्यानंतर एकनाथ शिंदेंनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवसेनेकडे महसूल खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातूनही मोठी माहिती समोर आली आहे.
Dilip Walse Patil-Ajit Pawar
Dilip Walse Patil-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आले आहे.या सरकारचा शपथविधी सोहळाही मोठ्या थाटात पार पडला आहे. या सोहळ्यानंतर काही वेळातच महायुतीच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. या सरकारमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपल्याला मंत्रिपद नको असल्याचं पक्षाला कळवलं आहे. त्यांच्याकडे राज्यपाल पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा वाजत गाजत पार पडला.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, दिग्गज भाजपा नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यानंतर उर्वरित महायुती सरकारमधील मंत्र्‍यांचा शपथविधी येत्या 11 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. यातच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Dilip Walse Patil-Ajit Pawar
Raj Thackeray : महायुतीच्या शपथविधीनंतर काही क्षणांतच राज ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, 'माझा सरकारला पाठिंबा असेल, पण...

एकीकडे रुसव्या फुगव्यानंतर एकनाथ शिंदेंनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवसेनेकडे महसूल खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातूनही मोठी माहिती समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात महायुतीत हालचालींना वेग आला आहे. याबाबतचं वृत्त साम वृत्तवाहिनीने दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे सातव्यांदा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रि‍पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता होती. पण त्याआधीच त्यांनी स्वत: प्रकृतीचं कारण देत मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता अजित पवारांनी त्यांच्यासाठी दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींकडून राज्यपाल पद मिळवल्याची चर्चा आहे.

Dilip Walse Patil-Ajit Pawar
Deputy CM Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांंनंतर एकनाथ शिंदेंच्या नावावर नोंदविला गेला ‘हा’ अनोखा विक्रम...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू असताना दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठीच दिल्लीत आले होते अशी चर्चा होती. शाहांसोबतच्या बैठकीत राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ कॅबिनेट मंत्रिपदं,केंद्रात प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यपालपद मिळावे, ही मागणी अजित पवार करणार होते. पण ही भेट काही झाली नाही. पण आता वळसे पाटलांकडे राज्यपाल पद दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 235 जागा मिळाल्या असून त्यात भाजप 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 41 जागा मिळाल्या आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मंत्रिपदं येतात, याची उत्सुकता त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यालाही आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com