
Mumbai News : मुंबई महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर गुरुवारी (ता.5) मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. हा शपथविधी सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही शपथ घेतली. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सूचक ट्विट केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर काही क्षणांतच ट्विट करत देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) शिंदे आणि अजित पवारांचं अभिनंदन केलं आहे.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये फडणवीसांना खरंतर 2019 ला ही संधी फडणवीसांना मिळायला हवी होती,पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असल्याची खंत बोलून दाखवली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. तसेच २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं, त्यामुळे ती संधी हुकली असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून महायुती सरकारला अभिनंदन करतानाच इशाराही दिला आहे. पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,आणि उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.