Damage of Agricultural Crops : फडणवीस आणि कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत; नेमकं नुकसान किती?

देवेंद्र फडणवीसांनी राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीची आकडेवारी दिली
Damage of Agricultural Crops
Damage of Agricultural Crops

राज्यात होळी आणि धुळवडीच्या दिवशी राज्यभरात अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली. या नुकसानीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात माहिती दिली. पण त्याच दिवशी कृषी विभागानेही नुकसानीची आकडेवारी जारी केली. यामुळे फडणवीस यांनी दिलेली आणि कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे राज्यभरातील १३७२९ हेक्टरवरील पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती सभागृहात दिली होती. त्याच दिवशी कृषी विभागानेही नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. कृषी विभागाने ३८ ५६३ हेक्टर वरील काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे, फळबागांचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा नक्की किती असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Damage of Agricultural Crops
Caste Politics : जातीला खतपाणी घालण्याचे उद्योग? ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील भुसावळ धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर आणि बोदवड आदी तालुक्यात एकूण ८९६६ हेक्टरवरील शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदेखेडा, शिरपूर तालुक्यात तब्बल ८१५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण आदी तालुक्यातील ७५६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात ही आकडेवारी जारी केलेली आकडेवारी

नगर ४१०० हेक्टर, धुळ्यात ३१४४ हेक्टर , नंदूरबार १५७६ हेक्टर, जळगाव २१४ हेक्टर, पालघर ७६० हेक्टर, नाशिक २६८५ हेक्टर,बुलढाण्यात ७७५ हेक्टर आणि वाशिममध्ये ४७५ हेक्टर, असे एकूण १३७२९ हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहात दिली.

कृषी विभागाने नुकसानीची जारी केलेली जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हानिहाय झालेले नुकसान जळगावात ८९६६ हेक्टर, धुळे ८१५६ हेक्टर, रायगड २२५ हेक्टर, वाशिम ४७५, अकोला ११५ हेक्टर, औरंगाबाद ७५६८ हेक्टर, नगर ४१७७, नाशिक ४१५५ हेक्टर, सिंधुदुर्ग ४३ हेक्टर, पुणे ३९ हेक्टर पालघर २०१७ हेक्टर, नंदूरबार १७५३ हेक्टर, बुलडाणा ७७५ हेक्टर, वर्धा ८६ हेक्टर, आणि सोलापूर १३ हेक्टर , असे एकूण ३८५६३ हेक्टरवरील शेतपिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com