मनसेला मंत्रिपद अन् भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या चर्चा; राजू पाटलांचा मोठा खुलासा

MNS|BJP|Raju Patil : मनसेच्या एका नेत्याला भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदारकी मिळणार आहे, अशी चर्चा आहे.
Raju Patil Latest News
Raju Patil Latest Newssarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : भाजपच्या कोट्यातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना मंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा आहे. यावर मनसेचे (MNS) आमदार राजू पाटलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आत्तापर्यंत भाजपाला (BJP) पाठिंबा दिला, राष्ट्रपती निवडणूकीत देखील त्यांना पाठिंबा देत आहोत. हा पाठिंबा हिंदुत्वासाठी दिला आहे आणि याच करता आम्ही सरकार मध्ये आहोत. कोणत्याही अपेक्षेने किंवा मंत्रिपदाच्या अपेक्षेने आम्ही या सरकारला पाठिंबा दिला नाही, असे आमदार पाटलांनी सांगितले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (Raju Patil Latest News)

Raju Patil Latest News
नगरसेवक, जिल्हाप्रमुख ते थेट 'मातोश्री'ला आव्हान देणारे आमदार संतोष बांगर...

मनसेच्या एका नेत्याला भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदारकी मिळणार आहे, अशी चर्चा आहे. या प्रश्नावर पाटील म्हणाले की, जर विधानरिषदेवर आमच्या पक्षातील नेते आमदार म्हणून जात असतील आणि आमदारकी मिळत असेल तर आनंदच आहे. दोन्ही हाऊस मध्ये आमचा आवज असेल आणि अशी गोष्ट घडली तर स्वागत आहे, असे पाटील म्हणाले.

Raju Patil Latest News
उपमुख्यमंत्री आहे, हे स्वीकारायला फडणवीसांचं मन अजूनही तयार नाही…

दरम्यान, राज्यसभा निवडणूकीत मनसेने आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तेव्हा त्यांच्या एका मताला चांगलेच महत्व आले होते. मनसेच्या या सहकार्यामुळे त्यांना नव्या सरकारकडून भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर पाटील म्हणाले, आम्ही जो आतापर्यंत भाजपला पाठिंबा दिला आणि आता पण राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देत आहे, तो फक्त हिंदुत्वासाठी देत असून याच करिता आम्ही सरकारमध्ये आहोत. कोणत्याही अपेक्षेने किंवा मंत्रिपदाच्या अपेक्षेने आम्ही या सरकारला पाठिंबा दिला नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव या सरकारने कमी केल्याने या निर्णयाचे मनसेच्या वतीने स्वागत केले. याबरोबरच हे सरकार जनहिताचा निर्णय या पुढेही घेत राहिल, असे मत पाटलांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com