सरकार स्थापनेबाबत सुधीर मुनगंटिवार यांचे मोठे वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडत आहेत.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar sarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपच्या (BJP) कोअर कमिटीची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी झाली. त्यामध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटिवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.

भाजच्या बैठकीनंतर मुनगंटिवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, बैठकीमध्ये विधिमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आकलन केले गेले. राज्या समोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भाजप आपली भूमिका ठरवेल. भाजप सध्या वेट अँड वॉच या भूमिकेत, असल्याचे त्यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar
तुमच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांनी मातोश्रीचे उंबरे झिजवले, याची जाणीव ठेवा....

अविश्वास ठरावाची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. जसजसे प्रस्ताव येथील त्यानंतर पुन्हा कोर टीमची बैठक होईल. भाजप रोज होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून आहे. बंडखोर आमदार स्वतःला बंडखोर मानत नाहीत. ते स्वतःला शिवसैनिक समजत आहेत. ते २४ कॅरेट समजत आहेत. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही, असेही मुनगंटिवार यांनी स्पष्ट केले. आम्हाला आज तरी फ्लोर टेस्टच्या मागण्याची गरज वाटत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे. या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Sudhir Mungantiwar
बुलढाण्यात राजकारण तापले : सेना खासदाराची पक्षाच्या आंदोलनाला दांडी

शिंदे म्हणाले, ''हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!'' असल्याचे शिंदे यांनी म्हणटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे (Shivsena) गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com