Disha Salian Case : अखेर 'एसआयटी' स्थापन..; 'दिशा'च्या चौकशीने 'ठाकरें'च्या अडचणी वाढणार..?

Written order to Mumbai Police to set up SIT : राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश..
Disha Salian, Aaditya Thackeray
Disha Salian, Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Disha Salian Case: अखेर राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार आहे.

दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. यामुळे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोललं जात आहे.

मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन Disha Salian (वय 28) हिचा मृत्यू दि. 8 जून 2020 रोजी मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडल्याने झाला होता.

तर दि. 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशा सालियान मृत्यू प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

Disha Salian, Aaditya Thackeray
Sanjay Raut : "नेहरू, गांधींवर टीका; मग मोदी त्यापेक्षा वेगळे आहेत का" ?...

अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून Maharashtra Government मुंबई पोलिसांना Mumbai Police एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश प्राप्त झाले आहेत.

याआधी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला असल्याने यात कोणताही राजकीय 'टच' नसल्याचा सीबीआयनं निष्कर्ष काढला होता.

तसेच याप्रकरणी सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं राजकीय 'टच' नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाचे आमदार आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्या अडचणी या चौकशीमुळे वाढणार असल्याचं बोललं जात आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. तसेच, याप्रकरणी आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय.

( Edited by Amol Sutar )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com