
Mumbai News : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाच मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता तिच्या मृत्यू प्रकरणी मोठी धक्कादायक अपडेट समोर आली आहे. आता याप्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियन (Disha Salian) मृत्यूप्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहे.
दिशा सालियन प्रकरणातील नव्या धक्कादायक घडामोडीमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर,आदित्य ठाकरे,सूरज पांचोली,डिनो मारिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडल्याने झाला होता. याआधी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. तसेच याप्रकरणी महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेशही दिले होते.
दिशा सालियन प्रकरणी आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेयांच्या अडचणी या चौकशीमुळे वाढणार असल्याचं बोललं जात आहे.दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह काही आमदारांकडून सातत्यानं काही आमदार करत होते.
तसेच,याप्रकरणी आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळत होत्या.राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात होता. पण दिशाचे सालियनचे वडील यांनी यापूर्वी माझ्या मुलीनं आत्महत्या केली आहे.आमची कोणतीही तक्रार नाही,त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी करणं थांबवा अशी मागणी केली होती.
आता चार-पाच वर्षांनंतर आता पुन्हा एकदा दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे.त्यामुळे आता याप्रकरणाची फाईल पुन्हा एकदा ओपन झाली आहे. तसेच या याचिकेत माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यावर हा आरोप पेडणेकरांनी फेटाळून लावला आहे.तसेच आपण चौकशीसाठी तयार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
याआधी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला असल्याने यात कोणताही राजकीय 'टच' नसल्याचा सीबीआयनं निष्कर्ष काढला होता. तसेच याप्रकरणी सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं राजकीय 'टच' नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.