Sanjay Raut On Salim Kutta : बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताला कोणत्या गृहमंत्र्याने पॅरोल दिला? राऊतांचं फडणवीसांकडे बोट!

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis On Salim kutta Case : सलीम कुत्ता पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis On Salim kutta Case
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis On Salim kutta Case Sarkarnama

Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टीतील एक फोटो विधानसभेत झळकवला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. याच सलीम कुत्ता प्रकरणावरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. खासदार संजय राऊत यांनी आता सलीम कुत्ता प्रकरणी भाजपवरच गंभीर आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis On Salim kutta Case
Salim Kutta News : "मी तुम्हाला कुत्र्यासारखा दिसतो का? माझ्या नावापुढील 'कुत्ता' टॅग हटवा..."

संजय राऊत म्हणाले, 'मकाऊ येथील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोतील व्हिडिओ मला आमचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दिला, म्हणून त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केला झाली, असं समजंतय. अशा प्रकारे कारवाईचं कारण होऊ शकते का? आपला कायदा अशा पद्धतीने काम करतो? मुळात बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आला नाही. त्या व्हिडिओशी बडगुजरांचा काहीही संबंध नाही. भाजपच्या अंतर्गत लोकांकडून आपल्याला तो व्हिडिओ आला.

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis On Salim kutta Case
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; नाशिकमध्ये 'या' प्रकरणात गुन्हा दाखल!

"सलीम कु्त्ता प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, "बडगुजर यांचा बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचा पार्टी, हा भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केला होता. सलीम कुत्ताच्या सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केलं आणि त्यांचं निमंत्रण बडगुजरांना आल्यावर ते पार्टीत गेले," असा दावा राऊतांनी केला.

"सलीम कुत्ताला 'पॅरोल' कुणी दिला? गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो (सलीम कुत्ता) इतका गंभीर आरोपातला गुन्हेगार होता, तर त्याला कोणत्या गृहमंत्र्यांच्या सहीने बाहेर सोडण्यात आलं? 2016 साली गृहमंत्रालय शिवसेनेकडे नव्हतं, मग तो कुणी दिला? याचा तपास भाजपने करावा? मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं," असं राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अप्रत्यक्षपणे त्यांनी बोट दाखवले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com