Lok Sabha Election: 'महाविकास आघाडी लोकसभेच्या 35 ते 40 जागा जिंकेल'; संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut : 'जे दोन पक्ष कुबड्यांवरती उभे आहेत, यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट त्यांनी 45 जागांची भाषा करणं हे हास्यास्पद...'
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांची 'इंडिया' आघाडी (India Alliance) जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात 45 जागा जिंकू, असा दावा भाजप करत आहे, तर दुसरीकडे आपणच विजयी होणार असा दावा आघाडीकडून केला जात आहे. यातच रविवारी एक नवीन सर्वेक्षण समोर आले. या सर्वेक्षणनुसार राज्यात 'महायुती'ला धक्का बसणार आहे.

याच अनुषंगाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी राज्यात 35 ते 40 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. 'राज्यात महाविकास आघाडीने किमान 35 ते 40 जागा जिंकण्याची तयारी केली आहे. हा पहिला सर्वे असेल. मात्र, अजून काही प्रमुख लोक लोकसभेच्या आधी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ते गणित देखील बदलणार आहे. आम्ही 40 जागा लोकसभेला जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे', असा दावा राऊत यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर ठरवणार लोकसभेचा 'रोडमॅप' ? राज्य कमिटीची तातडीची बैठक बोलावली

'भाजपने 'मिशन 45' चा दावा केलाय, यावर बोलताना राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'भाजप देशात एक हजार आणि राज्यात 148 देखील जागा जिंकू शकतात. भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे. भाजप हा जमिनीवरील पक्ष नाही. यात जे दोन पक्ष कुबड्यांवरती उभे आहेत, यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट, त्यांनी 45 जागांची भाषा करणे हास्यास्पद आहे', असा हल्लाबोल राऊतांनी केला.

याबरोबरच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'वंचित बहुजन आघाडी'बाबतही भाष्य करत प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांची आणि आमची भूमिका सारखी आहे. आमच्यात चर्चा नेहमी सकारात्मक होते. आम्ही सर्व एकत्रित बसणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. जागा वाटपांबाबत आमची चर्चा सुरू आहे. 'वंचित' आणि शिवसेना युती जाहीर झालेली आहे. 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्वतः 'वंचित बहुजन आघाडी'ला आघाडीत घेण्यासंदर्भात मत मांडले, असे त्यांनी सांगितले.

(Edited By - Ganesh Thombare)

Sanjay Raut
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency: राजकारण्यांच्या बातम्या छापणारे पत्रकार इम्तियाज जलील झाले खासदार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com