Politics of Dombivli : शिवसेनेच्या वर्चस्वामुळे भाजपमध्ये 'असहकार्या'चे सूर; वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीवरुन डोंबिवलीचे राजकारण तापले

BJP Vs Shivsena : राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा या मित्रपक्षात ठाणे जिल्ह्यात मात्र सुत जुळेनासे झाले आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Devendra Fadnavis, Eknath Shinde: Sarkarnama

BJP, Shiv Sena dispute news : राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा या मित्रपक्षात ठाणे जिल्ह्यात मात्र सुत जुळेनासे झाले आहे. विकासकामांसाठी लागणारा निधी, त्या कामांचे श्रेय शिवसेना हायजॅक करत असल्याने भाजपामध्ये आधीपासूनच धुसफुस सुरु झाली होती. त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले नंदू जोशी यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हे दोन्ही पक्षातील वितुष्ठ उघड होण्यास कारणीभूत ठरले आहे.

मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना ठाण्याचे पाठबळ असल्याने त्यांची बदली न होता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच दिव्यातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासही भाजपाला विशेष स्थान न देता शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनेच्या या वर्चस्वामुळे भाजपामध्ये (BJP) असहकार्याचे सूर उमटू लागले आहेत. मित्र पक्षास सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी बैठकीत घेतली. यावेळी शिवसेनेचा निषेध करण्यात आला.

Devendra Fadnavis, Eknath Shinde:
BJP News : भाजपचे 'मिशन 48' : लोकसभा निवडणूकप्रमुखांची घोषणा; मोहोळांवर पुण्याची तर लांडगेंवर... पाहा संपूर्ण यादी

ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपा व मनसेच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि शिंदे व फडणवीस सरकार आले. यामुळे काही काळ भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार अशी चर्चा असतानाच ठाण्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले आणि भाजपला आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची जाणीव झाली. राज्यात वरिष्ठ पातळीवर मैत्रीपूर्ण वातावरण असले तरी स्थानिक पातळीवर मात्र सातत्याने खटके उडत होते. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील याविषयीची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे बोलून दाखविली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Shahu Maharaj On Kolhapur Riot : कोल्हापुरातील राड्याप्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले; पोलिसांनी...

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना देखील याची झळ पोहोचू लागली. चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि हे दोन्ही पक्षातील वितुष्ठाचे कारण ठरले. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असे सांगत वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी केली. मात्र, ठाण्याचे पाठबळ बागडे यांना असल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या आधी ही बागडे हे एका ठराविक पक्षातील पदाधिकाऱ्यांनाच सहकार्य करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.

बागडे यांची बदली न झाल्याने भाजपामध्ये असंतोष खदखदत असतानाच दिवा येथे आयोजित विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपाला स्थान देण्यात आले नव्हते. शिवसैनिकांनी लावलेल्या बॅनरवर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना त्यात स्थान देण्यात आले नाही. याची चर्चा रंगल्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून जागोजागी बॅनर लावत चुक दुरुस्त करण्यात आली. मात्र भाजपाने यावरुन शिवसैनिकांना समाज माध्यमावर धारेवर धरल्याचे पहायला मिळाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत डोंबिवलीकर चव्हाण यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिवसेनेतून फारकत घेत गुवाहाटी दौरा करत राज्यात वेगळे सरकार स्थापन करणे या सर्व प्रवासात शिंदे यांच्यासोबत डोंबिवलीकर चव्हाण यांचा मोठा हातभार आहे. तसेच डोंबिवली विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे यांनी चव्हाण यांना मदत केली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Akola District News : अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी ‘या’ खासदार पुत्रावर !

तर लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांना निवडून देण्यासाठी भाजपाने मदत केली आहे. मग आत्ताच असे काय झाले की डोंबिवलीकर चव्हाण यांचे ठाणेकरांसोबतचे सूत जुळेनासे झालेत. त्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाकडे पुन्हा यावा अशी प्रबळ इच्छा कार्यकर्त्यांची आहे. त्यादृष्टीने भाजपाने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्याचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा हा शिवसेनेकडेच राहणार असा दावा केला आहे.

आम्हाला गृहीत धरु नका. विधान परिषद निवडणूक तसेच राष्ट्रपती निवडणुकीत मनसेचा पाठिंबा भाजपाला मिळाला होता. त्याची आठवण एका वरिष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांना या बैठकीत करुन दिली, असून लोकसभा निवडणुकीतही मनसेचा (MNS) पाठिंबा आम्हाला मिळू शकतो त्यामुळे ''गृहीत धरु नका'' असे त्यांनी शिवसेनेला सुचित केले. यासर्व घडामोडीवरुन भाजपा आणि शिवसेनेचे कल्याणध्ये जुळेना असे झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com