Kalyan Dombivali : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात भाजपने आपली मोठी ताकद निर्माण केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपिल पाटील यांची केंद्रात वर्णी लागून त्यांच्याकडे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पदाचा कारभार पक्षाने सोपविला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपले कंबर कसली असून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भाजपने वर्षभरापासून आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यातच कल्याण व भिवंडी लोकसभेतील खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे(Kisan Kathore) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
ठाणे ग्रामीण भागातील एका पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्यातला वाद विकोपाला गेला असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता कोणाच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही असे म्हणत आमदार कथोरे यांचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. यामुळे हा वाद आता कोणते राजकीय वळण घेतो याची चर्चा रंगू लागली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपले कंबर कसली असून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भाजप(BJP)ने वर्षभरापासून जिथे जिथे आपली ताकद कमी आहे, त्या ठिकाणी मंत्र्यांचे दौरे आयोजित करत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत तसे काम देखील सुरू केले आहे.
ग्रामीण भागात मोठी ताकद उभी करणाऱ्या भाजपमध्ये सध्या केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील जाहीर वादामुळे दुहीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपचे ग्रामीण भागाचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांची कार्यपद्धती सध्या या दोन नेत्यांच्या वादाचे कारण ठरली असल्याचे बोलले जात आहे. पाटील यांचे समर्थन लाभलेल्या मोहपे यांना हटवावे यासाठी कथोरे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु केल्याने एरवी सुरक्षित वाटणारा भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आता केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील(Kapil Patil) कोणाच्याही असण्याने नसण्याने काहीही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया मध्यमांना दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांना नाव न घेता टोमणा मारल्याची चर्चा कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगू लागली आहे.
(Edited By DeepaK Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.