Maratha Reservation : दिवंगत मेटेंचे चिरंजीव आशुतोष यांनी घेतली जरांगेंची भेट ; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

Beed News : अशुतोष मेटे यांनी रविवारी अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन संवाद साधला.
Ashutosh Mete News
Ashutosh Mete NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मागच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्टे पिंपळगाव येथे धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी सर्वप्रथम त्यांची दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांनी भेट घेतली होती. दिवंगत मेटे यांच्या विनंतीवरुनच जरांगे यांनी त्यावेळी आंदोलन मागे घेतले होते. आता त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव अशुतोष मेटे यांनी रविवारी अंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन संवाद साधला.

आंदोलनादम्यान समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसंग्रामचा लढा सुरुच राहणार असल्याचे मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले. दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या मराठा आरक्षण लढ्याचा उहापोह देखील यावेळी अशुतोष मेटे यांनी केला.

Ashutosh Mete News
Maratha Reservation News : गोदापात्र प्रतिकात्मक जलसमाधी ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आयोजित केलेल्या बैठकीला जातानाच दिवंगत मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले. मात्र, त्यांचे मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजबांधवांसोबत शिवसंग्राम कायम असल्याचे त्यांनी सांगीतले. आपण दिवंगत विनायकराव मेटे यांचा मुलगा म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashutosh Mete News
Arvind Kejriwal News : वन नेशन-वन इलेक्शन'शी आमचा काय संबंध ; 'एक राष्ट्र, एक शिक्षण' दिले पाहिजे : केजरीवालांची भाजपवर टीका

शिवसंग्राम पूर्ण ताकतीनिश सामाजचे प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तत्पर राहील मराठा बांधावा वरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी त्यांनी निक्षुन केली. समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे. त्याचबरोबर अंतरवाली या ठिकाणी झालेल्या पोलिसांच्या (Police) लाठी हल्ल्याचा जाहीर निषेधही आशुतोष मेटे यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com