BJP-Shivsena Dispute : भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी; फडणवीसांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा, काय घडलं?

BJP Vs Shivsena : '' सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे...''
Shinde-Fadnavis Advertisement
Shinde-Fadnavis AdvertisementSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : 'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' या वर्तमानपत्रातील जाहिरातीमुळे भाजप-शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचा दावा जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातील स्थानिक भाजप नेत्यामधील मतभेद शांत होत नाही.

तोच हे प्रकरण समोर आल्यानं शिंदे फडणवीस सरकारमधील मिठाचा खडा पडल्याचं स्पष्ट झालं आहे. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

Shinde-Fadnavis Advertisement
Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.13 जून ) राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समोर येत आहे. आणि विशेष म्हणजे या बैठकीत फडणवीस आणि शिंदेंमध्ये गेल्या काही दिवसांतील निर्माण झालेल्या भाजप-शिवसेना वादासह आजच्या वर्तमानपत्रातील जाहिरातींवर चर्चा झाल्याचं माहिती आहे.

वर्तमानपत्रामध्ये झळकलेल्या जाहिरातींमुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. यानंतर राज्यातलं राजकारण देखील चांगलंच ढवळून निघालं असून विरोधकांकडून भाजप(BJP)ला चांगलंच डिवचलं जात आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या मंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्यांनी युतीतील वादाच्या मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Shinde-Fadnavis Advertisement
Shrikant Shinde News : मोठी बातमी : जाहिरातीवरुन राजकारण तापलं; खासदार शिंदे दिल्लीला रवाना : मोठ्या घडामोडीची शक्यता?

फडणवीस शिवसेना मंत्र्यांना म्हणाले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) या बैठकीत म्हणाले, कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार आहे. सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपण एकत्रच आहोत. ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. युतीत खडा पडेल, असं कोणतंही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका असा कानमंत्र फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याची चर्चा सुरु आहे.

जयंत पाटलांचा टोला...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व्हे केला आहे. एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा आहे, तर भाजपने याचा विचार करावा. पण, महाविकास आघाडीपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.

Shinde-Fadnavis Advertisement
Shinde Group MLA News : शिंदे गटाच्या आमदाराने खा खा खाल्ले अन्‌ ४० हजारांचे बिल पाहून कॅन्टिनचालकावरच भडकले

पाटील म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून कोणी तरी या दंगली घडवत आहेत. त्या एकाच पॅटर्ननुसार होत आहेत. जिथे विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. विरोधकांची ताकद दाबण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com