Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

आतापर्यंत भाजपकडून देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र असा नारा देण्यात येत होता.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politic's : शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आज राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांत जाहिरात देत ‘राष्ट्रात नरेंद्र, तर महाराष्ट्रात शिंदे’ असा नवा नारा दिला आहे. याशिवाय शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जादा लोकप्रिय आहेत, असेही दर्शविण्यात आलेले आहे. सुमारे १०५ आमदार असलेला भारतीय जनता पक्ष हे सूत्र स्वीकारणार का, असा सवाल उपस्थित होतो आहे. (Will BJP accept the slogan 'Narendra in the nation, Shinde in Maharashtra'?)

शिवसेनेने (Shivsena) केलेल्या एका सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना २६.१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे, त्याच सर्व्हेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचेही दाखविण्यात आलेले आहे, त्यातून फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे हे महाराष्ट्रात जादा लोकप्रिय आहेत, असे प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र, हे भाजप (BJP) स्वीकारणार असा प्रश्न आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Rohit Pawar on Shiv Sena's Advt : फडणवीसांपेक्षा शिंदे जादा लोकप्रिय; रोहित पवार म्हणतात, ‘शिंदे गट स्वतःला....’

आतापर्यंत भाजपकडून देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र असा नारा देण्यात येत होता. तशी मांडणी भाजपकडून करण्यात येत होती. भाजपच्या अनेक सभांमधून तशी घोषणा केली जायची. केंद्रातील नेतेही भाषणात तसा उल्लेख करायचे. अगदी एकत्रित शिवसेनेबरोबर (ठाकरे गट) युती असतानाही अमित शहांसारखे वरिष्ठ नेतेही देशात नरेंद्र, तर राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा द्यायचे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Amol Kolhe Tour News : खासदार कोल्हेंना प्रश्न विचारणाऱ्या माजी सरपंचाला पोलिसांनी घरातून उचलून नेले; आदिवासींच्या विरोधाने पहिलाच दौरा गाजला

महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपबरोबर संसार थाटणारे एकनाथ शिंदे यांच्या एंट्रीमुळे फडणवीस यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार घालविण्यासाठी फडणवीस यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. शंभरपेक्षा जादा आमदार असूनही फडणवीस आणि भाजपला उपमुख्यमंत्री पदावर काम करावे लागत आहे. मात्र, आगामी निवडणुकीनंतर काय रचना असेल, याबाबत कोणतही चर्चा झालेली नसताना शिंदे गटाकडून राष्ट्रात नरेंद्र, तर महाराष्ट्रात शिंदे असा नवा नारा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Dispute in Kalyan BJP-Shivsena : युतीत खडाखडी कायम, ‘त्या’ PIवर भाजपचे गंभीर आरोप; सीबीआय, ईडीकडे तक्रार करणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ५५ आमदार असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारणारी भाजप चाळीस आमदारांच्या शिंदेपुढे कशी काय झुकली, असा प्रश्न बंडखोरीनंतर आणि आताही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

कोण पुढे, कोण मागे याला महत्व नाही : भाजप

शिंदे गटाच्या नव्या घोषणेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले. मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये १२४ आमदार निवडून आले होते, तर २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिले होते.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Shivsena Shinde Group Meeting : भाजप हायकमांडच्या मंत्र्यांना वगळण्याच्या सूचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली शिवसेनेची बैठक

नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडं मुख्यमंत्रीपद, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. दोघेही चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. फडणवीस यांनी जो लोकप्रिय अर्थसंकल्प मांडला, त्यामुळे सरकारची जी कामगिरी आहे, ती सर्वेक्षणातून बाहेर येत आहे. त्यामुळे देवेंद्र मागे पडले, एकनाथ शिंदे पुढे गेले, हा निष्कर्ष आपण लावतो. त्या निष्कर्षाला अर्थ ठरत नाही. शिवसेना-भाजप हे दोघे भाऊ म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे या दोघांच्या मनात कोणाला जास्त पसंती आहे, हे येत नाही. दोघेही जोरात काम करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com