Deepak Sawant State Minister: माजी आरोग्यमंत्री सावंतांची नाराजी दूर; मिळाला मंत्रिपदाचा दर्जा !

Maharashtra Government : दीपक सावंतांना शासन नियमानुसार लवकरच मिळणार सर्व सुविधा
Deepak Sawant
Deepak SawantSarkarnama

Mumbai Political News: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात 'नंबर' लागण्याची आशा असलेल्या माजी मंत्री दीपक सावंतांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. सावंतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आणि मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या शिंदे गटातील आमदारांना मोठा निधी देऊन तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत साशंकता आहे. आताही सावंतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन नवीन राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (Latest Political News)

Deepak Sawant
Kirit Somaiya News : किरीट सोमय्यांचं 'कमबॅक', ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; उद्या करणार नवा धमाका

राज्यातील आदीवासी भागात कुपोषित मुलांचे प्रमाण वाढत आहे. हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी एक कृती दल बनवले होते. या कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. या कृती दलाच्या समितीचे अध्यक्ष हे डॉ. दीपक सावंत होते. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याची बाब शासन दरबारी विचारधीन होती.

दरम्यान, वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार यापुढे डॉ. दीपक सावंतांना राज्यमंत्री पद देण्याचा शासन निर्णय सरकारने काढला आहे. यापुढे सावंत यांना वित्त विभागाच्या नियमानुसार शासनाच्या सर्व सोई सुविधा त्यांना देण्यात येतील. याबाबत सरकारच्या वतीने आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

Deepak Sawant
Nitesh Rane On Thackeray: "राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा 'औरंग्या' कोण होता?"; नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्य सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी शिंदे गटातील संजय शिरसाट, भरत गोगावले, डॉ. दीपक सावंत आदी आमदारांना तयारी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेतील सहभागाने त्यांच्या आशा मावळल्या आहेत. यामुळे या ना त्या मार्गातून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्यातील मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारांना महत्वाची पदे देऊन राजकीय पेच सरकार सोडवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. आता नाराज आमदारांची कोणत्या पदावर वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com