राज्यातील 14 महापालिकांतील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 महापालिकांतील सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
State Election Commission Latest News
State Election Commission Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई - शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह 14 महापालिकांतील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. या महापालिकांतील बहुसंख्य महापालिका या शिवसेना व भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. State Election Commission News Update

राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

State Election Commission Latest News
निवडणूक आयोग जिल्हानिहाय आढावा घेणार; नंतरच मतदानाच्या तारखा

मदान यांनी सांगितले की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

State Election Commission Latest News
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे मात्र फडणवीसांची साथ देऊ नये

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही मदान यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com