Mumbai Sanjay Raut Press Conferance : लोकसभा निवडणुकीसारखीच विधानसभा निवडणुकीची गत झाली; तर सत्तेचा गाशा गुंडाळावा लागेल, ढळढळीत वास्तावाने वेळीच सावध होऊन शिंदे - फडणवीस- पवार सरकारने लाडकी बहीण योजना आणली. योजना जाहीर झाल्यापासूनच सरकारमधील पक्षांच्या नेत्या, कार्यकत्यांनी गल्लीबोळात बॅनरबाजीचा उरुसच सुरू केला आहे.
एरवी, भाऊ हा बहिणीचे संरक्षण करतो, पण या गोजनेत लाडकी बहीण सरकारच्या खुर्चीचे संरक्षण करेल, असे बोलले जात आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या या आणि इतर योजनेवरून विरोधक सरकारला चिमटे काढण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) तर रोजच शिंदे- फडणवीसांना फटकारत आहेत.
लाडकी बहीण योजनेतील दीड हजार रूपयांचा मुद्दा काढून राऊत यांनी सरकारला महागडा सल्ला दिला. 'लाडक्या बहिणीला 10 हजार रुपये द्या. दीड हजारांत तिचे घर चालेल का,' असा सवाल करीत, राऊत हे सरकारला फुटकचा सल्ला देऊन मोकळे झाले.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका (vidhansabha Election) डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार घोषणांच्या पाऊस पाडत आहेत. लाडका भाऊ, लाडक्या बहिणीला पैसे देताहेत. निवडणुका आहेत तोपर्यंत ते पैसे देतील. पुढे काही सांगता येत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 'कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी योजना का नाही? असा रोखठोक सवालही राऊत यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजना राबवण्यातील संभाव्य अडचणी टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारला विरोधक रोजच घेरत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना राजकारण्यांच्या आरोप-प्रत्यारोपात बुडत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या कारभारावर नेहमीप्रमाणे कडक शब्दांत राऊतांनी गुरुवारी सकाळी पुन्हा ताशेरे ओढले. निरनिराळ्या मुद्यांवरून सरकारला सुनावले, तेव्हाच, लाडकी बहीण योजनेवरही राऊतांनी भूमिका मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.