(Sanjay Raut | ED Arrest | Latest news)
मुंबई : तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करण्यात आली आहे. आज (रविवारी) सकाळी ईडीच्या पथकाने राऊतांच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर दुपारी ईडीने (ED Action) त्यांना ताब्यातही घेतले होते. अखेर रविवारी सकाळपासून सुरु असलेल्या या नाट्यमय घडामोडींमध्ये ईडीने राऊत यांच्यावर सोमवारी रात्री 12.30 वाजता अटकेची कारवाई केली आहे. राऊतांना आता मेडिकल चेकअपसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार असून, उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. (Sanjay Raut | ED Arrest | Latest news)
राऊत यांना त्यांच्या घरातून ईडी कार्यालयात नेत असताना शिवसैनिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राऊत म्हणाले होते, जी काय कारवाई व्हायची आहे ती होऊ द्या, मी घाबरत नाही. राजकीय सुडाने हे सगळे चालले आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांचे बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो. हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही, असेही ते म्हणाले होते.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ येथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. (Sanjay Raut | ED Arrest | Latest news)
याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.