Buldhana Bus Accident News : शनिवारची सकाळ उगवली ती एका दु:खद बातमी समोर आली आहे. नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा (Vidarbha Travels Bus) बुलढाण्यातील (Buldhana) समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) भीषण अपघात झाला आहे. यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. बसच्या दरवाजा खाली गेल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. (Samrudhhi Mahamarg Accident)
यातील आठ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. समुद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. या बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केली आहे. झालेली घटना दुदैवी आहे, या घटनेत २५ जणांना मृत्यू झाला आहे. गंभीर प्रवाशांच्या उपचार सरकार करणार आहे. मृत्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बुलढाणाजवळच्या सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ मध्यरात्री हा अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बस ही नागपुरातील विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती मिळत आहे.
शुक्रवारी (ता. ३० जून) नागपूरवरून सायंकाळी पाच वाजता पुण्याकडे ही बस निघाली होती. शनिवारी (१ जुलै) रात्री एक वाजून २२ मिनिटांनी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे (Bus MH 29 BE 1819) समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटली.
बस उलटल्यानंतर काही मिनिटांतच तिने पेट घेतला. त्यानंतर स्फोट होऊन संपूर्ण बस जळाली. यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला (Pune) जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडच्या वाहनाने बस विझवण्यात आली. बसमधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने तातडीने सुरू केले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Samrudhhi Mahamarg Accident)
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.