Mumbai Nashik ED searches : 'ईडी' पहाटे चारपासून 'अ‍ॅक्शन मोड'वर; आयुक्त अनिलकुमार यांच्या निवासस्थानसह 12 ठिकाणी छापे

ED Raids Vasai Virar Commissioner Anilkumar Suryawanshi : नालासोपाराच्या 41 अनधिकृत इमारतीप्रकरणी 'ईडी'ने मुंबई, वसई विरार आणि नाशिकमध्ये 12 ठिकाणी छापे घातले आहेत.
Mumbai Nashik ED searches
Mumbai Nashik ED searchesSarkarnama
Published on
Updated on

ED raids Vasai Virar : सक्तवसुली संचालनालय आज पहाटेपासून अ‍ॅक्शन मोडवर आहे. मुंबई, वसई-विरार आणि नाशिकमध्ये 12 ठिकाणी 'ईडी'ने छापे घातले. नालासोपाराच्या 41 अनधिकृत इमारतीप्रकरणी 'ईडी'ने ही कारवाई सुरू केली आहे.

यात वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या सरकारी निवासस्थानाचा देखील छाप्यात समावेश आहे. यात 'ईडी'ने महत्त्वपूर्ण कागदपत्र ताब्यात घेतल्याने या छापेमारीला महत्त्व आले आहे.

नालासोपाराच्या 41 अनधिकृत इमारतीप्रकरणी 'ईडी'ने पहाटेपासून कारवाई सुरू केली आहे. 12 ठिकाणी छापे घातले असून, यात महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या सरकारी निवासस्थानी 'ईडी'ने छापेमारी केली आहे.

पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच आयुक्तपदाचा पदभार सोडून आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे दिला आहे. यानंतर अनिलकुमार यांच्यावर कारवाई सुरू झाल्याने 'ईडी'च्या छाप्याचे टायमिंग देखील चर्चेत आलं आहे.

Mumbai Nashik ED searches
Mumbai Police Drug Bust: मुंबई पोलिसांचा दणका, कर्नाटकमध्ये घुसून अमली पदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त; 390 कोटींचे ड्रग्स जप्त

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसई इथल्या दीनदयालनगरमधील निवासस्थानी सकाळी साडेसात वाजता ईडी पोचली. पदभार सोडताच काही तासांत ही 'ईडी'ने कारवाईला सुरवात केली.

Mumbai Nashik ED searches
Nimisha Priya: निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द? ग्रँड मुफ्ती कार्यालयाचा दावा भारत सरकारनं फेटाळला

नालासोपारा इथं डंपिंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतींप्रकरणी ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी 'ईडी'ने वसई-विरार शहरातील बिल्डर, आर्किटेक्ट आणि महापालिकेचे अधिकारी वाय. एस. रेड्डी यांच्यावरही याच प्रकरणी छापे टाकले होते.

'ईडी'चे अधिकारी अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. हे प्रकरण वसई-विरार, नालासोपारा पूर्वेकडील 41 अनधिकृत इमारतींशी संबंधित आहे, ज्या डंपिंग ग्राउंडवर बेकायदेशीरपणे बांधल्या गेल्या होत्या. या प्रकरणाची ईडीकडून (ED) सखोल चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com