
Biggest Drug Bust by Mumbai Police in Karnataka: मुंबई साकीनाका पोलिसांनी ड्रग्सविरोधात कारवाई करताना, थेट कर्नाटकमध्ये घुसून अमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली.
यात दोन कारखाने उद्ध्वस्त केले. आतापर्यंत 8 आरोपींना अटक करून 382 कोटी रुपयांच्या 188 किलो एमडीसह एकूण 390 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी पालघरमध्ये कारवाई केल्यानंतर कर्नाटकमध्ये ही कारवाई केली.
पालघर आणि कर्नाटक इथं केलेल्या कारवाईत साकीनाका पोलिसांनी चार महिन्यांत मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती करणारे दोन कारखाने उद्ध्वस्त केले. पालघरमधील कारवाईनंतर मिळालेल्या माहितीवरून कर्नाटकमध्ये कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारखान्यांत तयार होणारे एमडी प्रामुख्याने मुंबई (Mumbai) महानगर परिसरात विकले जात होते. या अमली पदार्थांची म्हैसूर ते मुंबईपर्यंतची वाहतूक होत असल्याचा संशय परिमंडल 10 पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी व्यक्त केला.
कर्नाटकच्या (Karnataka) म्हैसूर शहरानजीक रिंग रोडच्या सेवा रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये गॅरेज व्यवसायाआड हा कारखाना सुरू होता. साकीनाका पोलिस पथकाने 26 जुलैला त्यावर छापा घालून तब्बल 188 किलो एमडीसह एकूण 382 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार प्रमुख आरोपींना अटक केली. त्यातील दोघे गुजरातचे, एक मुंबईचा तर एक स्थानिक असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
एप्रिलअखेरीस साकीनाका पोलिस पथकाने सादिक शेख (वय 28) यास 53 ग्रॅम एमडीसह अटक केली. सादिकने वांद्रे इथल्या सलीम शेख ऊर्फ सलीम लंगडा याच्यासाठी काम करीत असल्याचे सांगितले. सलीमला मिरा रोडच्या सिराज पंजवानीकडून एमडीचा पुरवठा होतो, अशी माहितीही सादिकने दिली. त्याआधारे पथकाने पंजवानीला अटक केली.
यानंतर वसईतील कामणगाव येथील एम. के. ग्रीन, एएसी ब्लॉक कंपनीत छापा घालत एमडीच्या कारखाना उघडकीस आणला. तेथे आठ कोटींचे साडेचार किलो एमडी आणि आवश्यक रसायने, तंत्रसामग्री जप्त करण्यात आली. 25 जुलैला सलीम लंगडा साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या चौकशीतून म्हैसूर येथील कारखान्याची माहिती मिळताच पथकाने दुसऱ्या दिवशी तेथे छापा घातला.
188 किलो तयार एमडी, दोन ओव्हन, 12 हिटिंग मशीन, 168 किलो आयसोप्रॉपिलिन अल्कोहोल, 168 किलो ॲसिटोन, 60 किलो क्लोरोफॉर्म, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट असे अमली पदार्थ सापडले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.