Jayant Patil ED Summons: जयंत पाटलांना दुसऱ्यांदा ईडी'च समन्स

दोन दिवसांपुर्वीही जयंत पाटील यांना ईडी'ने नोटीस पाठवत त्यांना आज (15 मे) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
 Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

Jayant Patil ED Summons : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा एकदा सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. त्यांना २२ मे ला ईडी'च्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (ED summons Jayant Patil for the second time)

दोन दिवसांपुर्वीही जयंत पाटील यांना ईडी'ने नोटीस पाठवत त्यांना आज (15 मे) ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी ईडी'कडे वेळ मागितली होती. त्यानंतर त्यांना IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. (Jayant Patil news)

 Jayant Patil
Fadnavis On Thackeray : विधानसभा अध्यक्षांवर दबाब आणणं ही कुठली लोकशाही ? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

दरम्यान, पहिल्यांदाच नोटीस आल्यानंतर जयंत पाटील म्हणाले होते की, ईडीने नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्यातील फाईल काढून पाहिल्या तर IL&FS नावाची कुठली तरी संस्था आहे. त्यासंबधीची ही केस आहे. पण या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही".

" मी कधी IL&FS नावाच्या कंपनीकडून लोन घेतले नाही. पण तरीही मला नोटीस आलेली आहे. त्यामुळे ते जी काही चौकशी करणार आहेत, त्याला सामोरं जाऊ. मात्र, सध्या दोन-तीन दिवस सध्या लग्नसराई आहे. काही जवळच्या व्यक्तींचे लग्न आहेत. त्यामुळे मी दोन-तीन दिवसांचा वेळ त्यांच्याकडून मागवून घेणार आहे", असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं होतं

 Jayant Patil
Rahul Narvekar Returned To Mumbai: मुंबईत पाय ठेवताच राहुल नार्वेकरांनी वाढवले ठाकरेंचे टेन्शन; भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर म्हणाले...

जयंत पाटील (Jayant Patil ) यांना आयएल आणि एफएलएस या प्रकरणी ईडी'ने नोटीस पाठवल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांनी आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com