विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ईडी सक्रीय; परबांना आजच कार्यालयात बोलावलं

मनी लाँर्डिंग प्रकरणात ईडीने परबांना मंगळवारी नोटीस बजावली आहे.
Minister Anil Parab Latest Marathi News
Minister Anil Parab Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरच ईडीने शिवसेनेचे (Shivsena) नेते व मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांना ईडीने मंगळवारी नोटीस बजावत तातडीनं बुधवारीच (ता. 15) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे परब या चौकशीला सामोरे जाणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Anil Parab Latets News)

मुरुड येथे रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून (ED) ही चौकशी केली जात आहे. ईडीला मनी लाँर्डिंगचा संशय असून नुकतीच परबांच्या घरासह विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. दापोली येथे चौकशी करण्यासाठी गेलेले पथक सात दिवस तळ ठोकून होते. या तपासादरम्यान ईडीने मुरूड ग्रामपंचायत, दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशा ठिकाणी जाऊन पुरावेरुपी कागदपत्रे जमा केल्याचे समजते. त्यानंतर मंगळवारी त्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

Minister Anil Parab Latest Marathi News
जे काही करायचं ते रणांगणात! महाडिकांच्या विजयानंतर सतेज पाटलांचं काय ठरलंय?

काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान ईडी पथकाने परब यांची तब्बल १३ तास चौकशी केली होती. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला माजी खासदार किरीट सोमय्या आरोप करत असलेल्या साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्टवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हे पत्र ३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला पाठवले आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता अधिक आहे. राज्याने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर या रिसॉर्टप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. २०१७ मध्ये एक कोटी रुपये खर्च करून मंत्री अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली साई रिसॉर्टची जमिन खरेदी केली. पुढे २०१७ ते २०२० या काळात साई रिसॉर्टवर २५ कोटी रुपये खर्च केले.

पण ३० डिसेंबर २०२० रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परब यांनी त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना १.१० कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. याशिवाय हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रारही किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com