Nanded Loksabha News : डेंजर झोनमध्ये असलेल्या नांदेडमधून भाजपाचे अनेक इच्छुक

Resentment in constituencies about MP : मतदारसंघात खासदारांबद्दल नाराजी
Ram Patil Ratolikar, Santukrao Hambarde
Ram Patil Ratolikar, Santukrao HambardeSarkarnama
Published on
Updated on

Marathwada BJP News : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाने जोरात सुरू केली आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे मिशन भाजपाने हाती घेतले आहे. पण या मिशनमध्ये भाजपामधील अंतर्गत गटबाजी, विद्यमान खासदारांबद्दल असणारी नाराजी अडथळा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करीत ही जागा खेचून आणली होती.

पण गेल्या साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. खासदार चिखलीकर यांचे जिल्ह्यातील आपल्याच पक्षाच्या आमदारांशी पटत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. अगदी त्यांच्यासमक्ष समर्थकांनी भाजपाच्याच आमदारांवर गंभीर आरोप केले. यातून चिखलीकर समर्थकाची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली. शिवाय भाजपाने (BJP) केलेल्या सर्व्हेमध्ये नांदेड लोकसभेची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Patil Ratolikar, Santukrao Hambarde
Narendra Modi : पंतप्रधान कार्यालयाने थेट विदर्भाच्या रेल्वे विभागालाच केली विचारणा की...

असे असले तरी नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत भाजपाने बहुमतासह सत्ता मिळवली. या राज्यात मोदींची गॅरंटी चालली, याच मोदी गॅरंटीवर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा अनेक मतदारसंघांत एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळेच नांदेड (Nanded) लोकसभेची जागा डेंजर झोनमध्ये असली तरी इथून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मात्र वाढताना दिसते आहे. विद्यमान खासदार चिखलीकर आपणच लढवणार व जिंकणार, असा दावा करीत आहेत. दुसऱ्यांदा दिल्ली (Delhi) गाठण्यासाठी तयारी सुरू करताना पदाधिकारी मेळावे, बैठक घेऊन चिखलीकर कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे भाजपात इच्छुकांची संख्या वाढत आहे.

यात आमदार राम पाटील-रातोळीकर, संतुकराव हंबर्डे यांच्या नावांची भर पडली आहे. आमदार रातोळीकरांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक जोरदार फिल्डिंग लावत आहेत. भाजपात उत्सुकांच्या निवडणूक लढविण्याच्या सुप्त इच्छा प्रकट होत असल्यामुळे चिखलीकरांची चिंता मात्र वाढणार आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आमदार राम पाटील रातोळीकर यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढविण्यासाठी तयार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

Ram Patil Ratolikar, Santukrao Hambarde
Mahayuti News : शिंदे-फडणवीसांच्या आदेशानंतर संभाजीनगरात महायुतीचे स्थानिक नेते एकत्र बसणार

नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे हेसुद्धा उत्सुक असल्याची चर्चा आहे. नांदेड‌‌ शहरात व परिसरात संतुकराव हंबर्डे यांचे शैक्षणिक संस्थेचे खूप मोठे जाळे आहे. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. त्यांचे नाव आता लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आले आहे. नांदेड-बिदर या रेल्वेमार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने सुमारे साडेसातशे कोटींची तरतूद केली आहे. या रेल्वेमार्गासाठी आजी-माजीआमदार, खासदार, सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केला आहे. या कामाच्या श्रेयासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व आमदार राम पाटील-रातोळीकर हे पुढे आले आहेत. त्यामुळे पक्षात श्रेयवादाची लढाई दिसून येत आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

R...

Ram Patil Ratolikar, Santukrao Hambarde
Shivsena News : मोठी बातमी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकालाचा अखेर मुहूर्त ठरला; 'या' दिवशी करणार घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com