NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाची 'दुरी क्या कहलाती हैं'?

Ajit Pawar Group Away From Swachhata Abhiyan : अजित पवार गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित....
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Swachh Bharat Abhiyan Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमही स्वच्छतेचे महत्त्व सांगत असतात. स्वच्छता अभियान त्यांनी देशभर सुरू केले. महाराष्ट्रातही सरकारमधील अनेक नेते या अभियानात सहभाग घेताना दिसतात. मात्र या सगळ्यात अभियानापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गट दूरच असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर होते. नाशिकमधल्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात त्यांनी हातात झाडू घेऊन मंदिर परिसरात साफ सफाई केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांनी मंदिरात सफाई करत अभियानात सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनीही यामध्ये सहभाग घेतला. भाजप नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. केंद्रीय मंत्रीही राज्यात येऊन ठिकठिकाणी स्वछता करत आहेत.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Shiv Sena MLA Disqualification : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार? शिंदे गटाच्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी

अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचा यामध्ये कुठेही सभाग दिसत नाही. अजित पवार हे मंत्रालयात त्यांच्या दालनात उपस्थित असतात. मात्र हातात झाडू घेऊन साफ सफाई करताना दिसत नाहीत. जेव्हा ते उपमुख्यमंत्री बनले होते, त्यावेळी त्यांनी पुण्यात एकदा स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. मात्र त्यानंतर ते कुठेही या मोहिमेत सहभागी होताना दिसले नाहीत.

पंतप्रधानच्या आवाहनाला नेत्यांकडून प्रतिसाद

स्वच्छता अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात आणि राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने रबावण्यात येत आहे. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वछता करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावरून राज्यातील मंदिरांमध्ये सगळे नेते झाडून साफ सफाई करायला उतरले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात झाडू घेऊन साफ सफाई अभियानात सहभाग घेतला. त्यांच्या नेत्यांनीही यामध्ये भाग घेतला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी यातून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. या सगळ्या स्वच्छता अभियानामध्ये अजित पवार गट कुठेही सक्रिय दिसून येत नाही आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईत स्वच्छतेचे वारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले काही रविवार रस्त्यावर उतरून स्वच्छता करत आहेत. मुंबईत प्रदूषणाची पातळी फार वाढली आहे. हवेची गुणवत्ता खालवल्याने नागरिकांमध्ये आजार वाढलेले दिसून येत आहेत. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हातात झाडू घेऊन प्रत्येक वॉर्डमधील रस्त्यावर उतरून साफ सफाई करत आहेत. आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व देत आहेत.

edited by sachin fulpagare

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Political News : मुख्यमंत्री फडणवीस म्हणत शिंदेंच्याच नेत्यानं गायलं गुणगान; तिघे म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com