Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापूर्वीच 19 आशा वर्करना अचानक...

Asha Worker Rally : रेंगाळलेल्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी गुलाबपुष्प देऊन देणार होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Asha Worker in Thane
Asha Worker in ThaneSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News :

ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी शहापूर ते मंत्रालय अशा पदयात्रेला सुरू केली होती. आज ही पदयात्रा ठाण्यात आल्यावर त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेवून त्यांना शुभेच्छा देणार होते आणि पाऊण लाख गुलाबपुष्प देऊन रेंगाळलेल्या मागण्यांची आठवण करून देणार होते.

तत्पूर्वी अनेक ठाण्यात दाखल झालेल्या अनेक आशा वर्कर आजारी पडल्या. त्यातील 19 आशा स्वयंसेविकांना उष्माघात त्रास झाला आहे.

Asha Worker in Thane
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा सल्ला पोलिसांना अन् निशाणा विरोधकांवर, म्हणाले...

आशा वर्करच्या मागण्या अनेक वर्षांपासून पूर्ण केल्या जात नाहीत. या मागण्यासाठी 12 जानेवारीपासून त्या बेमुदत संपावर आहेत. या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे (Eknath Shinde) लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर (Asha Worker) मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून आणि गुलाबाचे फूल देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार होत्या. तत्पूर्वी 19 आशा स्वयंसेविकांना उष्माघात त्रास झाला आहे.

या आजारी पडलेल्या 19 आशा स्वयंसेविकांना तातडीने कळव्यातील ठाणे महापालिकेच्या (TMC) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यातील दहा आशा स्वयंसेविकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हा शासकीय रुग्णालयाने खबरदारी म्हणून तातडीने 100 बेड्सची व्यवस्था करून ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, सुमारे 84 हजार आशा स्वयंसेविका आणि 4 हजार गटप्रवर्तक कर्मचारी 2005 पासून कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ग्रामीण आदिवासी तसेच महापालिका क्षेत्रातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचे महत्त्वाचे काम करतात.

निर्णय झाला, आदेश रेंगाळला

1 नोव्हेंबर 2023 रोजी, आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये, आश स्वयंसेविकांना 7 हजार आणि 2 हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले होते. तसेच त्याबाबतचे शासकीय आदेश विनाविलंब काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तीन महिने उलटूनही मानधनवाढीचा शासकीय आदेश निघालेला नाही. त्यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 12 जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला आहे.

संप बेदखल

या संपाला तीन आठवडे होऊन सुद्धा राज्य सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही. म्हणून ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी आणि गटप्रवर्तकांनी बुधवारपासून शहापूर ते मंत्रालय या पदयात्रेला सुरुवात केली. त्या शुक्रवारी ठाण्यात दाखल झाल्या. मात्र त्यातील 19 जणींना उष्मघाताचा त्रास झाला.

(Edited by Avinash Chandane)

Asha Worker in Thane
Eknath Shinde News : वाढदिवसाआधी मुख्यमंत्री शिंदेंचा नवा अवतार; 'हातात धनुष्य, भगवा झेंडा अन् पाठीवर भाता..'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com