Eknath Shinde Vs Udhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी दिली उद्धव ठाकरेंना रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा

Lok Sabha Election 2024 : आज ‘उबाठा’ला हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. त्यांच्यात हिंदू म्हणून घेण्याची हिंमत राहिली नाही. हिंदू हृदयसम्राट म्हणण्याची देखील त्यांना लाज वाटत आहे. ही लाचारी मतांसाठी आहे.
Uddhav Thackeray vs Eknath
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSarkarnama

Mumbai Political News : ज्या शिवतीर्थावरुन शिवसेना प्रमुखांची डरकाळी घूमत होती. त्याच 'उबाठा'ला हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिंदू हृदयसम्राट म्हणण्यासही त्यांना लाज वाटत असून ही लाचारी मतांसाठी आहे, असा हल्लाबोल करत मोदींवर टीका करणारे अनेक रंग बदलणारे सरडे आहेत. पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कोणीही पाहिला नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. Eknath Shinde Vs Udhav Thackeray

मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची सभा झाली. सभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदे Eknath Shinde म्हणाले, मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी आपण आज या ठिकाणी सगळे एकत्र आलो आहोत. याच शिवतीर्थावरुन ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूभगिनी आणि मातांनो’ अशी शिवसेना प्रमुखांची डरकाळी घूमत होती. आज याच ‘उबाठा’ला हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. त्यांच्यात हिंदू म्हणून घेण्याची हिंमत राहिली नाही. हिंदू हृदयसम्राट म्हणण्याची देखील त्यांना लाज वाटत आहे. ही लाचारी मतांसाठी आहे. माणूस किती बदलू शकतो हे आपण पाहू शकतो. मोदींबद्दल उद॒गार काढले, प्रशंसा केली, त्यांना शिव्या शाप घालणारे अनेक रंग बदलणारे सरडे पाहिले. पण, इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कोणीही पाहिला नाही.

Uddhav Thackeray vs Eknath
Narendra Modi Vs Sharad Pawar : PM मोदींचं शरद पवारांना चॅलेंज! 'राहुल गांधींकडून वचन घ्या की...'

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी यांच्यावर बाळासाहेबांनी हल्लाबोल केला होता. आज त्याच शिवतीर्थावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उबाठाचे नेते बसत आहे. उबाठाचा हात काँग्रेस के साथ आहे, असे सांगत आहेत. भारत बोलतो आणि जग हालते ही परिस्थिती पहिली कधीच नव्हती. जगातील अनेक राष्ट्राध्यक्ष मोदींना मानतात. मोदींजींचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनायचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणीतरी म्हणाले, फेसबुकवरुन देश चालविणार, घरात बसून देश चालविणार का,असे म्हणताच एकच हश्या पिकला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार करत आहेत. देशातील १४० कोटी जनता म्हणते माझं मतं मोदींना. कारण, त्यांनी देश सुरक्षित ठेवला, त्यांनी गरिबांचे कल्याण केले, त्यांनी भ्रष्टाचार रोखला. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकवरुन पाचव्या क्रमांकावर आणली, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray vs Eknath
Sanjay Raut On PM Modi : मोदीजी आप तो गयो...; संजय राऊतांचा थेट मुळावरच घाव, नेमके काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com