assembly floor test : भाजपचा जल्लोष : शिंदे सरकारकडून बहुमताचा आकडा पार

शेलार यांची यंदा मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला 164 मते मिळाली आहेत. विरोधात ९९ मते पडली. विधासभा अध्यक्ष निवडणुकीप्रमाणे आजही समाजवादी पक्ष व एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. (Maharashtra assembly floor test news)

आजच शिंदे गटाच दाखल झालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी बहुमताच्या बाजूने मतदान करताच सेना आमदारांनी घोषणा दिल्या. मतमोजणीला सुरुवात होताच विधानसभा सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. तोपर्यंत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सभागृहात दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे ते मतदानास मुकले आहेत.​

Eknath Shinde
Maharashtra Floor test Live : विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण ठरले 'लेटलतिफ'

आशिष शेलार यांचे नाव तालिका अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे शेलार यांची यंदा मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिंदे गटाने जारी केलेल्या व्हीपविरोधात शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विधानसभा अध्यक्षांना या व्हीपला मान्यता देण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, असा मुद्दा त्यांनी मांडला. मात्र, 11 जुलैच्या सुनावणीतच यावर निर्णय होईल, असे न्यायालय म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com